कपडे वाळत घालण्यासाठी वायर खांबावर बांधू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 04:10 PM2020-10-08T16:10:15+5:302020-10-08T16:10:45+5:30

Awareness about energy conservation : विद्युत अपघात टाळण्यासाठी जन-जागृती आवश्यक

Do not tie to a wire pole to dry clothes | कपडे वाळत घालण्यासाठी वायर खांबावर बांधू नका

कपडे वाळत घालण्यासाठी वायर खांबावर बांधू नका

googlenewsNext

मुंबई : अनेकदा कपडे वाळत घालण्यासाठी लोक वायर खांबावर बांधतात, पण कुठेतरी लांब फॉल्ट असल्यास या वायरीत वीज प्रवाह उतरू शकतो, ज्यामुळे अपघाताची शक्यता असते. तरी, दोरी वगैरे खांब किंवा स्टेच्या तारेला बांधू नये, असे आवाहन महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले.

दैनंदिन जीवनात विजेशिवाय काम करता येत नाही. वीज वापराचे प्रमाण शहरी भाग तसेच ग्रामीण भागातही वाढत चालले आहे. आजच्या काळात, वीज ही मूलभूत गरज बनली आहे. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत विजेपासून होणाऱ्या अपघातांच्या घटना पाहता अधिक सतर्कतेने व सुरक्षितपणे विजेचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीज उपकरणे खरेदी करताना काही महत्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. वीज उपकरणे ही आय.एस.आय. प्रमाणित व योग्य क्षमतेची असल्याची खात्री करावी. सुरक्षिततेकरिता विजेवर चालणाऱ्या उपकरणाचा धातूचा बाह्य भाग अर्थिंग करणे अतिशय आवश्यक असते. खाजगी वायरमनकडून लाईनवरची कामे करून घेऊ नये. मिटर रूम स्वच्छ, प्रकाशित व हवेशीर असली पाहिजे. त्याच बरोबर भिंतीना पाणी लागून ओल्या होणार नाहीत  याची काळजी घ्यावी.

सध्या शॉर्ट सर्किट होऊन विविध कंपन्यांमध्ये व घरामध्ये आग लागण्याचे प्रमाण दिवसंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. तरी, कंपनीमधील अथवा घरातील वायरींगसाठी आय.एस.आय. प्रमाणित उपकरणे वापरल्यास असे प्रकार कमी करता शक्य होईल. आपले होणारे अधिक नुकसान टाळता येईल. म्हणून सुरक्षेचे उपायाची अंमलबजावणी प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे.

-----------------------

- मिटररूमचा वापर स्टोअररूम म्हणून करू नये.
- मिटररूममध्ये उंदरांचा वावर होणार नाही याच्याकडे लक्ष दिले पाहिजे.
- ज्वालाग्राही पदार्थ ठेवण्यास टाळायला हवे.
- कुठेही तुटलेल्या तारांना स्पर्श किंवा ओलांडू नये.
- मीटर बोर्डपासून मोटारीपर्यंत जाणाऱ्या वायर्सना शक्यतो जॉइंट ठेवू नये.

-----------------------

- जॉइंट असल्यास त्यांना बरोबर टेपने सील करून घ्यावे.
- उघडे वाटर हीटर वापरू नयेत.
- टेबल पंखे , इस्त्री वापरताना सावधतेने हाताळने आवश्यक आहे.
- पिन प्लग लावताना/काढताना  स्वीच बंद करूनच पिन लावा/काढा.
- शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यास प्रथम मेन स्वीच बंद करावे.
 

Web Title: Do not tie to a wire pole to dry clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.