‘शिक्षकांना व्हॉट्सअॅपवर बदली आदेश नको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 05:23 AM2018-06-10T05:23:47+5:302018-06-10T05:23:47+5:30
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार एका सहायक शिक्षकाला देण्यात आले होते. या शिक्षकामार्फत रात्री-अपरात्री व्हॉट्सअॅपवर बदलीचे आदेश इतर शिक्षकांना पाठवले जात होते.
मुंबई - जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार एका सहायक शिक्षकाला देण्यात आले होते. या शिक्षकामार्फत रात्री-अपरात्री व्हॉट्सअॅपवर बदलीचे आदेश इतर शिक्षकांना पाठवले जात होते. अशा पद्धतीने राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचा सुरू असलेला कारभार पाहून मुंबई उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. राज्य सरकार व्हॉट्सअॅपवर अशी महत्त्वाची कामे कधीपासून करू लागले, असा सवाल उपस्थित करत व्हॉट्सअॅपची ही पद्धत तत्काळ थांबवण्याचे निर्देश न्या. एस.सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांगरे याच्या खंडपीठाने सरकारला दिले आहेत.