इमानची काळजी करू नका
By admin | Published: January 23, 2017 06:04 AM2017-01-23T06:04:35+5:302017-01-23T06:04:35+5:30
गातील सर्वांत लठ्ठ महिला असणाऱ्या इजिप्तमधील इमान अहमद हिच्या कुटुंबीयांची नुकतीच प्रख्यात बेरिएट्रीक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला
मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला असणाऱ्या इजिप्तमधील इमान अहमद हिच्या कुटुंबीयांची नुकतीच प्रख्यात बेरिएट्रीक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी भेट घेतली. इजिप्तमधील अलेक्झॅन्ड्रियातील इमानच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत डॉ. मुफ्फझल लकडावाला यांनी सद्य:स्थितीतील प्रकृतीचा आढावा घेत, अहमद कुटुंबीयांना इमानची काळजी न करण्याचा विश्वास दिला.
गेल्या आठवड्यात झालेल्या या भेटीत इमानला भारतात येण्यासाठी विशेष विमानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डॉ. लकडावाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिवाय, या भेटीदरम्यान इमान यांच्या बहिणींशी चर्चा करून तिचा दिनक्रम, आहार आणि औषधोपचारांची माहितीही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, तसेच इमानच्या अपवादात्मक प्रकरणात करण्यात येणाऱ्या धोकादायक बेरिएट्रीक सर्जरी ही अतिशय जबाबदारीने करण्यात येईल, विश्वासही इमानची बहीण शायना अहमद यांच्याशी बोलताना व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपूर्वी इमानच्या शस्त्रक्रियेसाठी टिष्ट्वटरवरून भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मदत मागितली होती. त्यानंतर, इमान अहमद अब्लदुलाती ही चर्चेत आली. केवळ ३६ वर्षांची असलेल्या इमानचे वजन ५०० किलो असल्याने तिला घराबाहेर पडता येत नाही. इमान दैनंदिन व्यवहारासाठी पूर्णपणे आईसह बहिणीवर अवलंबून राहते. जन्मावेळी तिचे वजन ५ किलो होते. (प्रतिनिधी)