मुंबई - कंझ्युमर गाइडन्स सोसायटी आॅफ इंडिया (सीजीएसआय)कडून, जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत राज्यातील एकूण ८४८ दुधाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६०२ दुधाचे नमुने भेसळयुक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. उर्वरित २४६ दुधाच्या नमुन्यांच्या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) निर्देशांचे पालन करण्यात आल्याचे निदर्शनास आले. हे प्रमाण २९.०१ टक्के असून, दुधात भेसळीचे प्रमाण ७०.९९ टक्क्यापर्यंत वाढले आहे. परिणामी, दूध विक्रेते, दूध वितरक आणि दूध उत्पादक कंपन्यांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे सीजीएसआयचे म्हणणे आहे.अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय)नुसार, राज्यातील प्रत्येक प्राण्यांच्या दुधाच्या फॅटची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, गायीच्या दुधाचे फॅट ३.२, म्हशीच्या दुधाचे फॅट ६.०, उंटाच्या दुधाचे फॅट २.०, शेळीच्या दुधाचे फॅट ३.५ असणे आवश्यक आहे. दुधातील फॅट यापेक्षा कमी नोंदविले गेल्यास, संबंधितांकडून एफएसएआयच्या निर्देशाचे पालन केले जात नसल्याचे मानले जाते.शिवाय दुधात पाण्याची किंवा अन्यपदार्थांची भेसळ करण्यात येते, असे कंझ्युमर गाइडन्स सोसायटी आॅफ इंडियाचे म्हणणे आहे. ज्या दुधाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्या ८४८ दूध नमुन्यामध्ये १८६ बॅ्रँडेड दूध (कंपनीचे दूध) आणि ६६२ बॅ्रँडेड नसलेले दूध (खुल्या रीतीने विकले जाणारे दूध) याचा समावेश होता. १८६ बँॅ्रडेड दुधाच्या नमुन्याच्या तपासणीच्या दरम्यान १२१ दूध नमुन्यांनी एफएसएसएआयचे पालन केलेले नाही. या दुधात भेसळ असल्याचे सीजीएसआयचे म्हणणे आहे. उर्वरित ६५ दूध नमुने एफएसएसएआय निर्देशांचे पालन करणारे आहेत. ६६२ बँ्रडेड नसलेल्या दुधाची (खुल्या रीतीने विकले जाणारे दूध) तपासणी केली असता, यापैकी ४८१ दुधाच्या नमुन्यांमध्ये एफएसएसएआय निर्देशांचे पालन करण्यात आले नाही. उर्वरित१८१ दूध नमुन्यामध्ये एफएसएसएआय निर्देशांचे पालन करण्यात आले आहे.मोफत दूध परीक्षण सेवा -भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी सीजीएसआय मोफत दूध परीक्षण सेवा उपलब्ध करून देत आहे. आझाद मैदान येथील कामा रुग्णालय येथे सीजीएसआयच्या कार्यालयात दुधाचे परीक्षण करता येईल. मुंबई शहर आणि उपनगरात सीजीएसआयचे उपक्रम राबविले जातात. यात दुधाचे ५० पेक्षा जास्त नमुने एकाच वेळी तपासून दिले जातात.दुधातीलफॅट हे एफएसएसएआयच्या निर्देशांपेक्षा कमी असल्यासदुधात भेसळअसल्याचे सिद्ध होते. एफएसएसएआयच्या निर्देशांचे पालन करून दूध विकणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी झालेल्या संशोधनाच्या तुलनेत या वर्षी झालेल्या संशोधनानुसार, दुधामध्ये ५ टक्के दूषित पदार्थ वाढल्याचे निदर्शनास आले आहे.-डॉ. सीताराम दीक्षित, अध्यक्ष, सीजीएसआय.एकूण दुधाच्या नमुन्याची तपासणी ८४८ टक्केवारीबँॅ्रडेड दूध १८६ २१.९३ब्रँडेड नसलेले दूध ६६२ ७८.०७एफएसएसएआय निर्देशांचे पालन करणारे २४६ २९.०१एफएसएसएआय निर्देशांचे न पालन करणारे ६०२ ७०.९९एकूण ब्रँडेड दूध (कंपनीमधील दूध) १८६ टक्केवारीएफएसएसएआय निर्देशांचे पालन करणारे ६५ ३४.९५एफएसएसएआय निर्देशांचे न पालन करणारे १२१ ६५.०५एकूण ब्रँडेड नसलेले दूध ६६२ टक्केवारी(खुल्या रीतीने विकले जाणारे दूध)एफएसएसएआय निर्देशांचे पालन करणारे १८१ २७.३४एफएसएसएआय निर्देशांचे न पालन करणारे ४८१ ७२.६६
तुमच्या घरी भेसळयुक्त दूध तर येत नाही ना? ८४८ पैकी ६०२ दुधाचे नमुने भेसळयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 7:12 AM