Join us

दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तसेच शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली असणे अत्यंत गरजेचे आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तसेच शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली असणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाबाधित व्यक्तीला विविध लक्षणे आढळून येतात. त्यापैकी शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावणे हे एक महत्त्वाचे लक्षण जाणवू लागले आहे. मात्र घरच्या घरी दररोज सहा मिनिटे चालून ऑक्सिजन पातळीची तपासणी करणे अगदी सहज शक्य आहे.

* असे लागणार साहित्य

चाचणी करण्यासाठी घरात असणारे घड्याळ व पल्स ऑक्सिमीटर असणे गरजेचे आहे. पल्स ऑक्सिमीटर कोणत्याही मेडिकलमध्ये उपलब्ध आहे.

* अशी करा चाचणी

आपल्याला बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी. नंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात घड्याळ लावून सहा मिनिटे स्थिर गतीने वॉक करावा. नंतर पुन्हा ऑक्सिमीटरवरील नोंद घ्यावी. सहा मिनिटे चालल्यानंतर धाप येणे, दम लागल्यासारखे होत असेल तर तातडीने डॉक्टरांना दाखवावे.

* कोणी करायची ही टेस्ट?

सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे असतील, तसेच गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांनी दररोज ही चाचणी करावी.

- डॉ. रमाकांत बनकर

* यासाठी ठरेल उपयुक्त

कोरोनाच्या काळात शरीरात ऑक्सिजन मुबलक प्रमाणात असणे गरजेचे आहे. हल्ली रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळत नाहीत, त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे. अशा वेळेस घरीच दररोज स्वतःची ऑक्सिमीटरद्वारे पेस्ट करून घेणे सोयीचे आहे.

.........................................