असे करायचे बनावट पासपोर्ट तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:24 AM2020-12-15T04:24:38+5:302020-12-15T04:24:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बांगलादेशी नागरिकांना बनावट पासपोर्ट मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रासह, बनावट सरकारी शिक्के, तसेच बँक खात्याचाही ...

To do so, create a fake passport | असे करायचे बनावट पासपोर्ट तयार

असे करायचे बनावट पासपोर्ट तयार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बांगलादेशी नागरिकांना बनावट पासपोर्ट मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रासह, बनावट सरकारी शिक्के, तसेच बँक खात्याचाही वापर करण्यात आला. या प्रकरणी एटीएस अधिक तपास करत आहेत.

एटीएसने अटक केलेल्या रफीक शेख हा अर्जदाराच्या पासपोर्टसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, शिधावाटप पत्रिका, इलेक्ट्रिक बिल, भाडे करार, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेचा दाखला व बँक खात्याचे पासबुक अशा कागदपत्रांची गरज असल्याने, वरील कागदपत्रांपैकी तो स्वतःला संबंधित अर्जदारांच्या बनावट भाडेकरार, बनावट शपथ पत्र तयार करून पॅन कार्ड तयार करून घेत असे. त्यानंतर, अर्जदाराच्या पॅन कार्डच्या आधारे आधार कार्ड तयार करून घ्यायचा. पुढे पारपत्रासाठी लागणाऱ्या शाळा सोडल्याचा दाखला जन्मतारखेचा दाखला कागदपत्रे बनावट तयार करून सर्व कागदपत्रांच्या आधारे पारपत्र मिळविण्यासाठी अर्ज करत असल्याचे समोर आले.

कागदपत्रांवर बनावट शाळा सोडल्याचे दाखले व जन्माचे दाखले यासाठी इद्रिस मोहम्मद शेख (५७) हा तयार करून देत होता. बनावट रबरी शिक्के अविन गंगाराम केदारे (३५) बनवायचा, तर नवी मुंबईचा नितीन निकम बनावट बँक पासबुक, शिधावाटप पत्रिका करून देत असल्याचे उघड झाले. त्यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

...............................

Web Title: To do so, create a fake passport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.