मुंबई : प्रत्येक व्यक्तीला प्रार्थनेचा अधिकार आहे. मात्र, याचा अर्थ कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकार तुम्हाला मिळाला असे नाही. रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड घेऊन तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जाल का, असा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शबरीमाला मंदिर प्रवेशाबाबत केला.ब्रिटिश उप-उच्चायुक्त आणि आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित यंग थिंकर्स कॉन्फरन्समध्ये इराणी बोलत होत्या. या वेळी ब्रिटिश डेप्युटी हायकमिशनर क्रिस्पिन सायमन, ओआरएफचे अध्यक्ष समीर सरन आणि विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ उपस्थित होते.इराणी, म्हणाल्या, मी स्वत: हिंदू आहे. मात्र माझे पती आणि दोन्ही मुले पारशी म्हणजे झोराष्ट्रीयन धर्माचे सदस्य आहेत. त्यामुळे मला त्यांच्यासोबत त्यांच्या प्रार्थनास्थळाला एकत्र भेट देता येत नाही. ही परिस्थिती मला पूर्णत: मान्य आहे. कारण मला त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा, प्रार्थनेचा अधिकार मान्य आहे. कोणत्याही धर्माचा अनादर करण्याचा अधिकार कुणालाच नाही, असे मत त्यांनी मांडले. इराणी यांच्या या वक्तव्यामुळे वादळ उठले असून सोशल मीडियावर ट्रोल झाल्या आहेत.
"रक्ताने माखलेले पॅड घेऊन मित्राच्या घरी जाल का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 5:18 AM