कोणी मदत करता का मदत?, वृद्ध बापाची मुंबईकरांना हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:50 AM2020-01-08T05:50:49+5:302020-01-08T05:50:55+5:30

जितेंद्र साहू या तरुणाच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा होत नसल्याने मध्य प्रदेशच्या वृद्ध बापाने मुंबईकरांकडे कोणी मदत देता का मदत?

Do you help anyone, call the old father of Mumbai | कोणी मदत करता का मदत?, वृद्ध बापाची मुंबईकरांना हाक

कोणी मदत करता का मदत?, वृद्ध बापाची मुंबईकरांना हाक

Next

मुंबई : नोकरीच्या पहिल्याच दिवशी भरधाव कारच्या धडकेत जखमी झालेल्या जितेंद्र साहू या तरुणाच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा होत नसल्याने मध्य प्रदेशच्या वृद्ध बापाने मुंबईकरांकडे कोणी मदत देता का मदत? अशी हाक देण्यास पुन्हा सुरुवात केली आहे.
मध्य प्रदेशच्या नादा खेडेगावातील ६० वर्षीय रामबहोहर साहू कुटुंबीयांसोबत राहतात. आई-वडिलांची गरिबीतून सुटका करण्यासाठी जितेंद्रने नोकरीसाठी मुंबईत धाव घेतली. नोकरीच्या पहिल्या दिवशी काम उरकून परतत असताना २७ डिसेंबर रोजी व्यावसायिक स्करीया व्हई थॉमस याच्या भरधाव कारच्या धडकेत त्याचा अपघात झाला. याबाबत ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या मथळ्याखाली त्यांची व्यथा मंगळवारी ‘लोकमत’मध्ये मांडण्यात आली. या भीषण अपघातात त्यांच्या मुलाची एक बाजू निकामी झाली असून, तो अंथरुणाला खिळला आहे.
१० दिवस उलटूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. दरम्यान, मुलाच्या औषधोपचाराच्या खर्चासाठी रामबहोहर साहू यांनी मुंबईकरांना मदतीसाठी आवाहन केले आहे. सध्या विविध स्थानकांवर थांबून अन्य नातेवाइकांच्या मदतीने ते मुलासाठी पैसे गोळा करीत आहेत. तसेच वेगावर नियंत्रण ठेवा, असे आवाहनही ते वाहनचालकांना करीत आहेत.
>मदतीसाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन
एका अपघाताने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. सध्या दोन वेळच्या जेवणाची सोय झाली आहे. तशीच मुलाच्या मदतीसाठीही नागरिकांनी पुढे यावे; जेणेकरून माझा मुलगा लवकर बरा होईल,’ असे साहू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Do you help anyone, call the old father of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.