पर्यावरणप्रेमी अन् दहशतवादी यांच्यातील फरक कळतो का?; युवासेनेचा भाजपा नेत्याला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 11:52 AM2019-12-03T11:52:04+5:302019-12-03T11:59:17+5:30

युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य जय सरपोतदार यांनी चोख उत्तर दिलं आहे. 

Do you know the difference between environmentalist and terrorist ?; Yuva Sena reply to BJP leader | पर्यावरणप्रेमी अन् दहशतवादी यांच्यातील फरक कळतो का?; युवासेनेचा भाजपा नेत्याला टोला

पर्यावरणप्रेमी अन् दहशतवादी यांच्यातील फरक कळतो का?; युवासेनेचा भाजपा नेत्याला टोला

googlenewsNext

मुंबई - राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर एकेकाळचे भाजपा-शिवसेना नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावरुन भाजपा नेते मोहित भारतीय यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्याला युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य जय सरपोतदार यांनी चोख उत्तर दिलं आहे. 

जय सरपोतदार यांनी ट्विट करत म्हटलंय की, मोहित भारतीय यांना पर्यावरणप्रेमी आणि दहशतवादी यांच्यातील फरक माहित नसावा हे स्पष्ट होतं. तसेच त्यांनी ज्या संधीचा उल्लेख केला आहे. त्याचा फायदा तुम्हीच उचलला पाहिजे असा टोलाही जय सरपोतदार यांनी भाजपा नेते मोहित भारतीय यांना लगावला आहे.

मागील काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनी आरे आंदोलकांवरील आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता लवकर महाराष्ट्र सरकार दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीनचीट देणार असल्याचा टोला भाजपा नेते मोहित भारतीय यांनी केला होता. 

याबाबत मोहित भारतीय यांनी ट्विट करुन म्हटलंय की, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला महाराष्ट्र सरकार लवकर क्लीनचीट देणार आहे. राज्यात गुन्हे मागे घेण्याचं सत्र सुरु आहे. त्वरा करा, काही दिवस शिल्लक आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. 

तसेच महाराष्ट्रात लोकशाहीची अशी अवस्था  पाहावयाला मिळत आहे की, विधानसभेत 288 उमेदवार निवडून येऊनसुद्धा त्यातील एकही मुख्यमंत्री होऊ शकला नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंत्रालय माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाले होते की, आरे कॉलनीत आता जेवढी झाडं राहिली आहेत, ती तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड पडणार नसून त्या झाडांचं पानही कुणी तोडणार नाही, असे म्हणत आरे कारशेडसाठीच्या जंगलतोडीला स्थगिती दिल्याचं सांगितले होते. तसेच आरे आंदोलकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. 

त्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतलात, आता नाणार आंदोलनाच्या केसेस पण परत घ्या, ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, अशी मागणी केली होती. यावर उद्धव ठाकरे यांनी आदेश देत नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: Do you know the difference between environmentalist and terrorist ?; Yuva Sena reply to BJP leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.