मुंबई - वीजबिलमाफीच्या मुद्यावरून आज राज्यात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार आंदोलन केले. राज्यातील विविध भागात भाजपाचे अनेक मोठे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, थकीत वीजबिलाच्या वसुलीवरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा तर नाहीच, उलट सावकारा सारखी वसूली कसली करताय? सरकार चालवताय की खाजगी सावकारी करताय? असा सवाल आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.आशिष शेलारांनी वीजबिलांच्या मुद्यावरून ट्विट करत महाविकास आघाडीवर टीका केली. त्यात ते म्हणाले की, अवाजवी आणि वाढीव वीजबिलं आकारून महाराष्ट्राच्या जनतेची लूट सरकार करू पाहतेय. सरकारच्या या "पठाणी" कारभाराची भाजपाने आज होळी पेटवली आहे! अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा तर नाहीच, उलट सावकारा सारखी वसूली कसली करताय?सरकार चालवताय कि खाजगी सावकारी करताय?
"सरकार चालवताय की खाजगी सावकारी करताय?" महाविकास आघाडी सरकारला सवाल
By बाळकृष्ण परब | Published: November 23, 2020 4:31 PM