स्वत:च्या फिटनेसचा तुम्ही विचार करता का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 01:12 PM2023-09-11T13:12:41+5:302023-09-11T13:12:52+5:30

Fitness: मायानगरी मुंबईच्या धावपळीच्या जगात स्वतःच्या अस्तित्वासाठी अविरत धावपळ करणाऱ्या माझ्या मुंबईकर मित्रांना माझा एक सोपा प्रश्न आहे. या सर्व धबडग्यात तुम्ही कधी तुमच्या आरोग्याचा किंवा तुम्ही किती फिट आहात याचा निवांत विचार केलाय का? सर सलामत तो पगडी पचास! हे विसरायचे नाही. 

Do you think about your own fitness? | स्वत:च्या फिटनेसचा तुम्ही विचार करता का?

स्वत:च्या फिटनेसचा तुम्ही विचार करता का?

googlenewsNext

- अर्जुन विर्दी
(फिटनेस कोच
सुपरस्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या दमदार अभिनयाने रंगलेल्या ‘आनंद’ या सिनेमातील एक वाक्य मला फार भावते. ‘जिंदगी बडी होनी चाहीए...लंबी नहीं’!, मी फिटनेस क्षेत्रात काही दशकं काम करतोय. त्यामुळे हे वाक्य मी थोडं बदललं आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हा मंत्र देतो की, जिंदगी लंबी नहीं, बडी ‘हेल्दी’ होनीं चाहीए!, तर मायानगरी मुंबईच्या धावपळीच्या जगात स्वतःच्या अस्तित्वासाठी अविरत धावपळ करणाऱ्या माझ्या मुंबईकर मित्रांना माझा एक सोपा प्रश्न आहे. या सर्व धबडग्यात तुम्ही कधी तुमच्या आरोग्याचा किंवा तुम्ही किती फिट आहात याचा निवांत विचार केलाय का? सर सलामत तो पगडी पचास! हे विसरायचे नाही. 

आपल्या रोजच्या जीवनशैलीचा जरी मागोवा घेतला तरी आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. आज आपल्याला काही अंतरावर जरी जायचे असेल तरी आपण पटकन टॅक्सी शोधतो. कोणत्याही इमारतीमध्ये गेलो तरी पहिल्यांदा लिफ्ट शोधतो. आपल्याला आरोग्यदायी जेवणासाठी वेळ नाही. भूक लागली की पटकन ऑनलाइन ऑर्डर करतो. आपल्याला आपल्या मुलांसोबत खेळायला वेळ आहे?, त्याऐवजी त्यांच्या हाती आपण महागडे फोन देतो. आपण ज्येष्ठांसोबत वेळ घालवतो की, त्यांच्यासाठी केअर टेकर ठेवतो? आपण मन लावून जेवतो की केवळ जेवायची वेळ झाली म्हणून अन्न पोटात ढकलतो? आपण पुरेशी झोप घेतो की निद्रानाश जडल्यावर झोपेच्या गोळ्या घेतो?, या प्रश्नांच्या जंजाळात आपण सापडलाे आहाेत.

    फिटनेस म्हणजे केवळ मॅरेथॉन धावणे, पदक मिळवणे किंवा सिक्स पॅक ॲप बॉडी तयार करणे हे नव्हे तर फिटनेस म्हणजे शरीर आणि मनाच्या पातळीवर असलेली सर्वांगीण निकोप अवस्था. 
    पृथ्वीतलावर आपल्याला मनुष्यजन्म लाभला आहे. त्यामुळे आपण सर्वात भाग्यवान आहोत. त्यामुळे या आयुष्याला आणि ते निकोप जगण्यासाठी आवश्यक शरीराला आपण न्याय देणे, हे आपले कर्तव्य आहे. 
    हा न्याय देताना, धावपळीच्या जगात एक छोटासा विराम घ्या. चाला, जिने चढा. संवाद वाढवा, खेळा, आरोग्यदायी अन्नाचे सेवन करा, पुरेशी झोप घ्या. 
    मनमुराद हसा, छंद जोपासा...या अतिशय लहान लहान गोष्टी आहेत; पण निरोगी आयुष्य जगण्यासाठी मनात उत्पन्न होणाऱ्या सकारात्मक भावनेसाठी होणारी ही सज्जता आहे. 
    हे एक छोटे पाऊल तुमच्यात भविष्यात सकारात्मक बदल करेल आणि हे केले तर तुमचेच भविष्य तुम्हाला त्या वयात पोहोचल्यावर धन्यवाद देण्यासाठी उभे असेल.
    ‘आनंद’ सिनेमातील आणखी एक वाक्य आठवते. मैं मरने से पहले मरना नहीं चाहता! आपण खरंच जगतोय? आता या अनुषंगाने आपण फिटनेस या संकल्पनेचा विचार करू. 

Web Title: Do you think about your own fitness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.