रेल्वेत डॉक्टर हवाय? १०० रुपये द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 05:44 AM2018-11-12T05:44:10+5:302018-11-12T05:44:28+5:30

रेल्वे बोर्डाचा निर्णय : प्रवासात वैद्यकीय उपचारांसाठी शुल्क आकारणार

Do you want a doctor? Give 100 rupees! | रेल्वेत डॉक्टर हवाय? १०० रुपये द्या!

रेल्वेत डॉक्टर हवाय? १०० रुपये द्या!

Next

मुंबई : भारतीय रेल्वेत प्रवासादरम्यान उपचार घेणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी धक्कादायक निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. प्रवाशांना रेल्वेत प्रवास करताना उपचार घेण्याची गरज भासल्यास वैद्यकीय सल्ल्यासाठी १०० रुपये आकारण्यात येतील. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टरी सल्ल्यासाठी सर्वसामान्यांना मानसिक त्रासासह आर्थिक झळही सहन करावी लागणार आहे. 

दिवाळीच्या मुहूर्तावर रेल्वे बोर्डाने १७ झोनमधील महाव्यवस्थापकांना डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी आकारण्यात येणाºया फीबाबत सूचना केल्या आहेत. रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार, रेल्वेत आॅनबोर्ड प्रवासी आजारी पडल्यास अथवा प्रवासादरम्यान वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासल्यास १०० रुपये शुल्क आकारण्यात यावे. ही रक्कम केवळ वैद्यकीय सल्ल्यासाठी असणार आहे. रेल्वेतील तिकीट तपासनीसांना हे पैसे आकारण्याचे अधिकार असणार आहेत. संबंधित प्रवाशाला औषधोपचाराची गरज भासल्यास त्यासाठी अधिक पैसे द्यावे लागणार असून, त्याची रीतसर योग्य पावती देखील देण्यात यावी. तसेच प्रवाशांकडून जमा झालेली रक्कम रेल्वेच्या उत्पन्नात दाखवण्यात यावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.
रेल्वे बोर्डाच्या आदेशाबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले की, रेल्वे प्रवाशांसाठी हेल्पलाइन आणि समाज माध्यम विशेषत: टिष्ट्वटरवर सक्रिय आहे. धावत्या ट्रेनमध्ये टिष्ट्वटरवरील टिष्ट्वटच्या माध्यमाने तत्काळ मदत उपलब्ध करण्यात येते. प्रवासी टिष्ट्वटच्या माध्यमाने ट्रेनमध्ये अस्वच्छता, पंखे-दिवे सुरू नसणे आणि वैद्यकीय मदत मागवतात. मात्र नुकतेच काही प्रवाशांकडून केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने टिष्ट्वट करून वैद्यकीय मदत मागवल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे अशा प्रवाशांना आळा घालण्यासाठी वैद्यकीय मदतीसाठी १०० रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.

दरम्यान, रेल्वे बोर्डाचा हा निर्णय सर्व प्रकारच्या रेल्वेसाठी लागू असणार आहे. तथापि, रेल्वे अपघात किंवा रेल्वे दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना हा नियम लागू नसल्याचे रेल्वे बोर्डाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.


वैद्यकीय सेवा ‘आॅनबोर्ड’

पूर्वी रेल्वे प्रवाशाला वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासल्यास आॅनबोर्ड तिकीट तपासनीस रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती देत असे. माहितीच्या आधारे नियंत्रण कक्षातून आगामी रेल्वे स्थानकात वैद्यकीय मदत उपलब्ध करून देत असे. मात्र सध्या रेल्वे प्रवाशांना डॉक्टरांची सुविधा आॅनबोर्ड देण्यात येते. प्राथमिक उपचाराअंती प्रवाशांना गरज असेल तरच जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Do you want a doctor? Give 100 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.