मुंबई : बोरीवलीकरांच्या परिचित असलेल्या योगेंद्र शुक्ला या डॉक्टरने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून या प्रकाराची वाच्यता केल्यास ठार मारू, अशी धमकी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी बलात्कार आणि बालअत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये डॉ. शुक्लाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली.
डॉ. शुक्ला डेन्टीस्ट आहे. त्याचे चार दवाखाने आहेत. तक्रारदार तरुणी डॉ. शुक्लाच्या एका दवाखान्यात काम करणा:या तरुणीची धाकटी बहीण आहे. तक्रारदार तरुणी आई व बहिणीसह बोरीवलीत वास्तव्यास आहे. तिची परिस्थिती प्रचंड हलाखीची आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत डॉ. शुक्लाने दवाखान्यात काम करणा:या तरुणीशी आणि तिच्या कुटुंबीयांशी ओळख वाढवली. वाईट हेतूने त्याने या कुटुंबाला हरप्रकारे मदत सुरू केली. त्या निमित्ताने त्यांच्या घरी ये-जा वाढवली. या दरम्यान डॉ. शुक्लाची नजर दवाखान्यात काम करणा:या तरुणीच्या 15वर्षीय बहिणीवर पडली. त्याने तिच्याशीही ओळख वाढवली.
1क् नोव्हेंबरला फिरायला नेतो, असे सांगून डॉ. शुक्लाने या अल्पवयीन मुलीला गोराई किना:यावर नेले. तेथे एका रिसॉर्टमधील खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. पुढे हा प्रकार कोणाला सांगितलास तर हत्या करेन, अशी धमकीही दिली.
दरम्यान, घडलेल्या अत्याचाराची तक्रार केल्यास डॉ. शुक्ला त्याच्या दवाखान्यात काम करणा:या मोठय़ा बहिणीला नोकरीवरून काढेल या भीतीने ही मुलगी गप्प राहिली. दुसरीकडे मुलगी आपल्या धमकीला घाबरल्याचा समज करून घेत डॉ. शुक्लाने पुन्हा तिला सोबत नेण्याचा प्रय} केला. तेव्हा मात्र या मुलीने आपल्या नातेवाइकांना घडला प्रकार सांगितला आणि प्रकरण कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून लागलीच डॉ. शुक्लाला अटक केली. (प्रतिनिधी)
शुक्ला कोठडीत
डॉ. शुक्ला याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना वाव देत शुक्लाला 15 डिसेंबर्पयत पोलीस कोठडी दिली.
विवाहित असलेला डॉ. शुक्ला आपल्या चार दवाखान्यांमध्ये कम्पाऊंडर म्हणून अल्पवयीन मुलींनाच ठेवे. त्याने याआधीही दवाखान्यात काम करणा:या मुलींवर अत्याचार केले असावेत, असा संशय कस्तुरबा मार्ग
पोलीस व्यक्त करतात.