Join us

मोबाइल क्लिनिकच्या माध्यमातून ‘डॉक्टर आपल्या दारी’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 1:08 AM

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी असलेली व्हॅन विभागात फिरून रुग्णांची पाहणी, तपासणी, उपचार करणार आहे. वरळी विभागातून बुधवारपासून पाच व्हॅनच्या माध्यमातून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबई : पालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी मोबाइल क्लिनिक व्हॅनमधून ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केलाआहे. यामध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी असलेली व्हॅन विभागात फिरून रुग्णांची पाहणी, तपासणी, उपचार करणार आहे. वरळी विभागातून बुधवारपासून पाच व्हॅनच्या माध्यमातून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.मुंबईत कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असला तरी लक्षणे दिसत नसल्याचे प्रकारही समोर येत आहेत. तर काहींमध्ये लक्षणे असूनही रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून कोणत्याही परिस्थितीत ‘कोरोना’कडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी मोबाइल क्लिनिक व्हॅनच्या माध्यमातून ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. यामध्ये पालिकेच्या जी-साऊथ विभागात पाच मोबाइल व्हॅन सुरू करण्यात आल्या आहेत. या व्हॅनमध्ये असणारे डॉक्टरांचे पथक थेट वॉर्डात जाऊन तपासणी करीत आहे.इतर आजार असल्यास आवश्यक उपचार करण्यात येतील. गरज भासल्यास संशयितांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन किंवा साहाय्यक उपचार करण्यात येतील. या पथकाकडून कोरोनाबाबत शंका, समस्यांबाबत मार्गदर्शनही होईल़>उपचारही केले जाणारया मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून डॉक्टर-आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन नागरिकांशी चर्चा करतील. लक्षणे असल्यास स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करण्यात येईल. लक्षणे नसल्यास व इतर आजार असल्यास आवश्यक उपचार करण्यात येतील.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस