- अतुल कुलकर्णी मुंबई : कोरोनाचे वाढते रुग्ण आणि डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन केरळहून ५० डॉक्टर्स आणि १०० नर्सेस बोलावण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहेल यांनी दिली. तसेच राज्यातील अन्य भागातील रुग्ण आता बरे होत असल्याने लातूर,
सध्या वर्धाहून ४५ डॉक्टर्स मुंबईत आले आहेत. लातूर आणि अंबाजोगाईहून प्रत्येकी ५० असे १०० डॉक्टर्स येत आहेत. मुंबईत ५० आयुर्वेदिक तर खासगी क्षेत्रातील २५० डॉक्टरांनी सेवा देण्याचे मान्य केले आहे. बीकेसीमधील १००० बेडचे व नॅस्को मधील ५५० बेडचे दोन्ही हॉस्पिटल १०० बेडच्या क्षमतेने सोमवारपासून सुरू होणार आहेत.
औषधांची मात्र लागू पण...
रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला सुरुवातीच्या तीन दिवसात जर ऋ’ं५्र३ं१ं५्र१ (फ्लेव्हीट्राविर) ही विषाणुप्रतिरोधक गोळी दिली, तर त्याचा चांगला परिणाम दिसत आहे. तर गंभीर रुग्णावर ळङ्मू्र’’्र९४ेुं (टोसिलिझुमॅब) आणि फीे्िर२्र५्र१ (रेमडिसिव्हीर) ही दोन इंजेक्शन परिणामकारक ठरत आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणीही हे औषध घेऊ नये, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. मुंबईत आत्तापर्यंत ६ रुग्णांना तर पुण्यात एका रुग्णावर प्लाज्मा थेरपीने उपचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत ५७ हजार बेडस्
मुंबई ९१ हॉस्पिटलमधून १२,०७४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच विविध शाळा, हॉटेल्स अशा ४३९ ठिकाणी ४५,०६२ बेडची सोय केली गेली आहे. एकूण ५७,१३६ बेडची सोय झाली आहे. असे असले तरी ३१ मेच्या आत १ लाख बेडची सोय करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत येत्या १० दिवसांत १ लाख बेडची सोय केली जाईल, असे मुंबई मनपा आयुक्त आय. एस. चहेल यांनी सांगितले.
राज्यात ७० लॅब
राज्यात आता ७० लॅब सुरु झाल्या असून त्यातील ४० लॅब सरकारी आहेत. आजपर्यंत ३,४८,९३२ रुग्णांच्या तपासण्या झाल्या आहेत. सरकारी लॅबची रोज ८५०० सॅम्पलची तर खासगी लॅबची रोज १०,१२५ सॅम्पल तपासण्याची क्षमता आहे. या दोन्ही ठिकाणी मिळून १२ ते १४ हजार चाचण्या रोज होत आहेत, असेही लहाने यांनी सांगितले.