Join us

डॉक्टर, वकील, एकत्र प्रवास करतील; तेव्हा एसटीचे भाग्य, शेखर चन्ने यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 2:06 PM

ST Bus: चाळीस वर्षांपूर्वी विद्यार्थी, डॉक्टर, वकील, शेतकरी यासह समाजातील सर्व घटक एसटीने प्रवास करत होते. परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही. काळानुसार एसटीच्या सेवेत काही बदल करणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया सध्या सुरु आहे.

मुंबई - चाळीस वर्षांपूर्वी विद्यार्थी, डॉक्टर, वकील, शेतकरी यासह समाजातील सर्व घटक एसटीने प्रवास करत होते. परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही. काळानुसार एसटीच्या सेवेत काही बदल करणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया सध्या सुरु आहे. येत्या तीन वर्षात एसटीची सेवा सुधारलेली दिसेल. समाजातील सर्व घटक प्रवास करतील  तेव्हा एसटी भाग्य बदलेल असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. 

‘लोकमत’ मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते शेखर चन्ने यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप  उपस्थित होते. यावेळी बोलताना चन्ने म्हणाले की, काळानुसार बदल करणे आवश्यक आहे. एसटीचा दर्जा, स्वच्छता सेवा यामध्ये सुधारणा न केल्यास नोकियाप्रमाणे स्थिती होईल. परंतु अशी वेळ येऊ यासाठी काम सुरु आहे. येत्या तीन वर्षात हा बदल पाहायला मिळेल. तर पूर्वी गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेशच्या परिवहन मंडळाची चर्चा असायची परंतु आता आपल्या एसटी महामंडळाची चर्चा आहे.  

कोकण म्हाडाचा चेहरा बदलण्यात योगदान  शेखर चन्ने हे कर्तबगार आणि सक्षम अधिकारी आहेत. कोकण म्हाडा मंडळाचा अध्यक्ष असताना ते मुख्य कार्यकारी अधिकारी होते.  कोकण म्हाडाचा चेहरा मोहरा बदलण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे असे महाराष्ट्र्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले.  

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय दिला एसटी कर्मचाऱ्यांना विविध अडचणी समस्यांना सामोरे जावे लागते. चन्ने यांच्यासमोर या बाबी मांडल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रश्न सोडविले. यामध्ये बालसंगोपन रजा, अनुकंपावर नोकरी ,वेतनवाढ त्रुटी यासह अनेक प्रश्न सोडवले. प्रवाशांसाठी सवलत योजना आणल्या. कोरोना आणि संपानंतर एसटी इतिहास जमा होईल अशी स्थिती होती. पण त्यातून मार्ग काढत आता एसटी उत्पन्नाचा इतिहास घडविला आहे, असे  महाराष्ट्र्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईएसटी