मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, या पार्श्वभूमीवर महापालिकेने रुग्णांसाठी खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने विरोध करुन मंगळवार ६ एप्रिलपासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नायर रुग्णालयातील रुग्णांचे हाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले. रुग्णालयातील सर्व खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यास डॉक्टरांनी विरोध केला. काही खाटा कोरोना नसलेल्या रुग्णांसाठी ठेवाव्यात, शिकाऊ डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सक्ती करू नये, अशी मागणी केली. नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांसोबत डॉक्टरांची बैठक सुरू असून मागण्या मान्य न केल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. मार्ड संघटनेने मागण्या मान्य न झाल्यास ६ एप्रिलपासून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला.याविषयी, निवासी मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी सांगितले, कोरोना काळात मागील वर्षभरात निवासी डॉक्टरांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले, कोविड रुग्णांच्या उपचारांसह नाॅन कोविड रुग्णांवरील उपचारही रुग्णालयात सुरू ठेवावेत, जेणेकरून निवासी डॉक्टरांना सर्व वैद्यकीय शाखेतील अनुभव मिळेल. रुग्णालय प्रशासनाने याचा विचार करावा.
नायरमधील डॉक्टरांचा ‘काम बंद’चा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 3:48 AM