डॉक्टरची ऑनलाइन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:15 AM2021-02-20T04:15:13+5:302021-02-20T04:15:13+5:30
मुंबई : अंधेरीतील ४७ वर्षीय डॉक्टरला बँकेतून बोलत असल्याचे सांगून ९० हजार रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. यात ...
मुंबई : अंधेरीतील ४७ वर्षीय डॉक्टरला बँकेतून बोलत असल्याचे सांगून ९० हजार रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. यात आरबीआयकडून प्राप्त आदेशानुसार, सर्वाचे क्रेडिट कार्ड लिमिट वाढवित फोटो आयडी तयार करत असल्याचे सांगून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
............................
बेकायदेशीर लॉटरीची विक्री
मुंबई : भोईवाडा येथे काही जण महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या पूर्वघोषित निकालाच्या स्क्रँच लाॅटरीच्या तिकिटांची विक्री करीत असताना सापडले. त्यानुसार, त्यांच्यावर कारवाई करत भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..............................
ड्रग्ज तस्करांची धरपकड सुरू
मुंबई : शाळा, महाविद्यालयीन परिसरात ड्रग्जची विक्री करणाऱ्यांविरुद्ध अमली पदार्थविरोधी पथकाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार, पोलिसांकड़ून गस्त सुरू आहे, तसेच आरोपींची धरपकडही करण्यात येत आहे.
................