डॉक्टरांना आयएमए देणार लसीकरणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 05:31 AM2018-10-22T05:31:31+5:302018-10-22T05:31:40+5:30

इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांना लसीकरणाविषयी प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे.

Doctors will be giving IMA vaccination lessons | डॉक्टरांना आयएमए देणार लसीकरणाचे धडे

डॉक्टरांना आयएमए देणार लसीकरणाचे धडे

Next

मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांना लसीकरणाविषयी प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. विविध आजारांच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणाऱ्या लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी लवकर आयएमए आपल्या डॉक्टर सभासदांना प्रशिक्षित करण्यासाठी माहितीपुस्तिका प्रकाशित करणार आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून ‘लाइफ कोर्स वॅक्सिन - पिडियाट्रीक टू जेरियाट्रीक’ ही पुस्तिका प्रकाशित होणार आहे. या माध्यमातून लसीकरणाविषयी असणाºया डॉक्टरांच्या समस्या, प्रश्नांचे निराकरण होण्यास मदत होणार आहे. लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेता प्रत्येक डॉक्टरला प्रत्येक लसीबाबत माहिती असावी, या उद्देशाने आयएमएने लसीकरणाबाबत डॉक्टरांना मार्गदर्शन करणाºया पुस्तिकेसाठी पुढाकार घेतला आहे.
आयएमएच्या लसीकरण समितीचे संयोजक डॉ. जयेश लेले यांनी याविषयी सांगितले की, अनेक डॉक्टरांना त्यांचे क्षेत्र सोडल्यास इतर डॉक्टरांच्या क्षेत्रातील लसीकरणाबाबत माहिती नसते. स्त्रीरोगतज्ज्ञांना महिलांना कोणत्या लसी द्याव्यात याबाबत माहिती असते. मात्र इतर रुग्णांना कोणत्या लसी द्याव्यात याबाबत माहिती नाही. बालरोगतज्ज्ञांना लहान मुलांना कोणत्या लसी द्याव्यात याबाबत माहिती आहे, मात्र प्रौढांना कोणत्या लसीची गरज असते हे माहिती नसते. प्रत्येक डॉक्टरला प्रत्येक लसीकरणाबाबत मार्गदर्शन करणार आहोत. अनेक डॉक्टरांना लसीकरणाबाबत अनेक गोष्टी माहिती नाहीत. सर्व आजारांशी संबंधित लसीकरणाबाबत माहिती देईल असे दस्तावेज सरकारकडेही नाहीत. लसीकरण हे प्रतिबंधात्मक साधन म्हणून किती महत्त्वाचे आहे याबाबत डॉक्टरांना माहिती देणे गरजेचे आहे. शिवाय अनेक नव्या लसी येणार आहेत त्याविषयीही यात माहिती आहे.
>म्हणून हाती घेतली मोहीम
अनेक डॉक्टरांना त्यांचे क्षेत्र सोडल्यास इतर डॉक्टरांच्या क्षेत्रातील लसीकरणाबाबत माहिती नसते. त्यामुळे ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Doctors will be giving IMA vaccination lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर