अंजनी दमानियाकडून भोसरी भूखंड गैरव्यवहारासंबंधी कागदपत्रे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:15 AM2021-01-08T04:15:02+5:302021-01-08T04:15:02+5:30

* असीम सरोदे यांच्याशी साधला ईडीने संपर्क लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या भोसरीतील ...

Documents related to Bhosari plot misappropriation submitted by Anjani Damania | अंजनी दमानियाकडून भोसरी भूखंड गैरव्यवहारासंबंधी कागदपत्रे सादर

अंजनी दमानियाकडून भोसरी भूखंड गैरव्यवहारासंबंधी कागदपत्रे सादर

Next

* असीम सरोदे यांच्याशी साधला ईडीने संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या भोसरीतील भूखंड गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपास सुरू केला आहे. तसेच या प्रकरणात याचिका दाखल केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी मंगळवारी त्यासंबंधी सर्व कागदपत्रे ईडीच्या कार्यालयात सादर केली. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील अ‍ॅड. असीम सरोदे यांच्याशीही संपर्क साधला असून, त्यांच्यासंबंधित कागदपत्रांची मागणी केली आहे.

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण गेल्या पाच वर्षांतून चर्चेत आहे. मात्र, पंधरवड्यापूर्वी ईडीने एकनाथ खडसे यांना ३० डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स बजाविले होते. मात्र, खडसेंना कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने त्यांची १४ दिवसांनंतर चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यानच्या कालावधीत भोसरीच्या भूखंडासंबंधी सर्व माहिती घेण्यास अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. त्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी अंजली दमानिया व अ‍ॅड. असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधून भूखंडप्रकरणी उपलब्ध कागदपत्रांची मागणी केली. यासंबंधी सहकार्य करण्याचे आश्वासन देताना सर्व दस्ताऐवज खुला आणि न्यायालयात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. दुपारी अंजनी दमानिया यांनी बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात जाऊन त्यासंबंधी सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.

Web Title: Documents related to Bhosari plot misappropriation submitted by Anjani Damania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.