मुंबई : सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. या साचलेल्या पाण्यात डेंग्यू व मलेरियाच्या डासांची पैदास होत असते. त्यामुळे अशा वस्तू हुडकून नष्ट करण्याची मोहीम महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने हाती घेतली आहे, तसेचघर व कार्यालय डासमुक्त करण्यासाठी मुंबईकरांनी सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेने करण्यात आले आहे.महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान घरात व घराशेजारील परिसरात साचलेल्या चमचाभर पाण्यातही डेंग्यू व मलेरियाचा प्रसार करणाºया डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली आहेत. हे लक्षात घेऊन आपल्या घराच्या व कार्यालयाच्या परिसराभोवती पाणी साचू शकेल, अशी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे संपूर्ण मुंबईत नियमित स्वरूपात तपासणी करून, टायर्स व पाणी साचतील अशा इतर वस्तू शोधून हटविण्यात येत आहेत. गेल्या सहा महिन्यांत के-पूर्व विभागात १,४९३, आर-उत्तर विभागातून १,२४८ व एल विभागातून १,२११टायर्स हटविण्यात आले आहेत, तर सर्व २४ विभागांतून १०,८७०टायर्स हटविण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त इतर वस्तूंमध्ये ४०,००० जी दक्षिण, २८,४७१ वस्तू डी विभागातून, तर २३,९९१ वस्तू या जी-उत्तर विभागातून हटविण्यात आल्या आहेत. सर्व २४ विभागांतून तीन लाख ८४,९७७ इतर वस्तू हटविण्यात आल्या आहेत..डासांचे अड्डे : साचलेल्या पाण्यात डासांची मादी एका वेळी सुमारे १०० ते १५० अंडी घालते. या अंड्यांमधून डास उत्पन्न होण्यास साधारणपणे आठवड्याभराचा कालावधी लागतो. हे लक्षात घेता, दर आठवड्यात किमान एकदा तरी आपल्या सोसायटीच्या व कार्यालयाच्या परिसराची तपासणी करून तिथे पाणी साचलेले नसल्याची खात्री करून घेणे, पाणी साचलेले आढळून आल्यास ते काढून टाकून नष्ट करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.>कोरडा दिवस पाळाडेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणाºया एडीस इजिप्टाय डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते, तर मलेरियाच्या बाबतीत मलेरियाचे परजिवी पसरविणाºया अॅनॅफिलीस स्टीफेन्सी डासाची उत्पत्तीदेखील स्वच्छ पाण्यातच होते. त्याचप्रमाणे, अनेक घरांच्या बाहेर पाणी साठविण्यासाठी पिंप व ड्रम वापरले जातात. यामध्येदेखील मोठ्या प्रमाणात डेंग्यू आजार पसरविणाºया डासांच्या अळ्या आढळून येतात. याकरिता हे पिंप व इतर पाणी साठविण्याची भांडी कोरडी ठेवून, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
साचलेल्या पाण्यात डासांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 2:33 AM