Join us

मुंबई महानगरात कुणी घर घेता का घर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 5:00 AM

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या मुंबई महानगर परिक्षेत्रातील प्रमुख शहरांमध्ये सध्या २ लाख ९३ हजार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.

मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या मुंबई महानगर परिक्षेत्रातील प्रमुख शहरांमध्ये सध्या २ लाख ९३ हजार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. देशातल्या ३५ प्रमुख शहरांमध्ये हा आकडा १३ लाख १५ हजारांवर गेला आहे. मात्र, त्यानंतरही या शहरांमध्ये नव्या बांधकामांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढताना दिसत आहे. २०१८ साली आॅक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ६७,०९३ नवीन घरे उभी राहिली. ती २०१९ साली ९२,४०९ इतकी वाढली.बांधकाम व्यवसायातील चढउतारांचे निरीक्षण नोंदविणाऱ्या लिजेस फोरस या कंपनीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली. बांधकाम व्यवसायाला मंदीचे वातावरण असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांची विक्री, प्रकल्पांची पायाभरणी सुरूच आहे. नव्या घरांच्या तुलनेत विक्री होणाºया घरांची संख्या कमी असल्याने बहुसंख्य घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळेच न विकलेल्या घरांच्या संख्येत ४ टक्के वाढ झाली आहे. एमएमआर क्षेत्रातील (मुंबई महानगर प्रदेश) घरांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत एक ते सात टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.> परवडणाºया घरांना मागणी५० लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या परवडणाºया घरांना चांगली मागणी आहे. या श्रेणीत २०१८ साली तिमाहीत ५३,३२० घरांची विक्री झाली. २०१९ साली तो आकडा ५५,५५१ एवढा वाढला. नव्याने उभ्या राहणाºया या श्रेणीतील घरांची संख्या ३७,९५८ वरून ६१,३१९ पर्यंत वाढली आहे. नव्या घरांमधील ६६ टक्के घरे या श्रेणीतली आहेत. पुण्यात ते प्रमाण ७५ तर एमएमआर क्षेत्रात ४९ टक्के आहे.>विक्री झालेल्या घरांची संख्या (आॅक्टोबर ते डिसेंबर)शहर २०१८ २०१९मुंबई ५,४७३ ४,९२२मध्य उपनगर ५,३५४ ५,७५३पश्चिम उपनगर २,५७२ २,१२९ठाणे १,६८३ १,९२०नवी मुंबई २,०४१ २,१७६पनवेल ८०१ ९०९एकूण १७,९२४ १७,८०९>ग्राहकांच्या प्रतीक्षेतील घरे (आॅक्टोबर ते डिसेंबर)शहर २०१८ २०१९मुंबई १,०६,३११ १,०९,१४७मध्य उपनगर ६४,६९८ ८१,५१२पश्चिम उपनगर ३८,९८५ ३६,३४९ठाणे २८,१२४ ३०,१२०नवी मुंबई १७,८८२ २१,२९९पनवेल १५,०११ १४,९४९एकूण २,७१,०११ २,९३,३७६