मराठी भाषा विभागाला कोणी संचालक देता का?; तीन मुख्यमंत्री आले अन् गेले पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 07:47 AM2022-08-12T07:47:03+5:302022-08-12T07:47:17+5:30

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठीच्या विकासासाठी भाषा संचालनालय हे कार्यालय स्थापन केले.

Does anyone provide a director for the Marathi language department?; Three Chief Ministers came and went but... | मराठी भाषा विभागाला कोणी संचालक देता का?; तीन मुख्यमंत्री आले अन् गेले पण...

मराठी भाषा विभागाला कोणी संचालक देता का?; तीन मुख्यमंत्री आले अन् गेले पण...

googlenewsNext

- सचिन लुंगसे

मुंबई : मराठी भाषेच्या समृद्धीसाठी राज्य सरकारने भाषा संचालनालय कार्यालयाची सुरूवात केली खरी; मात्र गेल्या २० वर्षांपासून कार्यालयाचे भाषा संचालकपद सरकारला भरता आलेले नाही. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हे पद भरण्यासाठीचे आश्वासन दिल्यानंतरही नोकरशाहीने हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला आहे. तीन मुख्यमंत्री आले, गेले पण हे पद भरण्यासाठी एकही व्यक्ती मराठी भाषा विभागाला मिळालेली नाही.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठीच्या विकासासाठी भाषा संचालनालय हे कार्यालय स्थापन केले. एकेकाळी डॉ. वा. ना. पंडित, शं. ना. नवरे , डॉ. वा. ल. कुलकर्णी, डॉ. य. शं. कानिटकर यासारख्या भाषातज्ज्ञांनी हे पद भूषविले. या काळात विविध विषयांचे कोश व परिभाषा कोश यांची निर्मिती करून मराठी भाषेचे दालन समृद्ध करण्यात आले. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये परिभाषा कोश निर्मितीची व अनुवादाची कामे ठप्प आहेत. भाषा संचालकपद थेट भरतीने भरण्यासाठी अलीकडेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात दिली. मात्र, या पदावर कनिष्ठ दर्जाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा करून मराठी भाषा विभागाने या पदाचे अवमूल्यन केल्याची टीका होत आहे.

प्रस्ताव ठेवला बासनात गुंडाळून 

तत्कालीन मराठी भाषा मंत्र्यांसमोर उच्चविद्याविभूषित व्यक्तीचा भाषा संचालक पदावर प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव व अर्ज होता. भाषा संचालक पदाच्या सेवानिमानुसार भाषा संचालक पदावर प्रतिनियुक्ती देण्यासाठी शैक्षणिक अर्हता व अनुभव यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता व अनुभव असलेल्या, प्रथितयश महाविद्यालयांमध्ये  मराठीचे अध्यापन, संशोधन कार्यानुभव असलेल्या व्यक्तीचा प्रस्ताव दोन वर्षे भाषा विभागाने तांत्रिक घोडे नाचवत बासनात गुंडाळून ठेवला.

Web Title: Does anyone provide a director for the Marathi language department?; Three Chief Ministers came and went but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.