मुंबई : आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत हे माहीत आहे, पण माझा त्यांचा परिचय नाही. आतापर्यंत त्यांना कधीच भेटले नाही, असे स्पष्टीकरण अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने मंगळवारी माध्यमांना दिलेल्या निवेदनात केला. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी रिया व तिच्या कुटुंबीयांविरुद्ध बिहार पोलिसांकडून वर्ग करण्यात आलेल्या गुन्हाचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचलानलय (ईडी ) मनी लॉन्डिंÑगच्या गुन्ह्याचा तपास करीत आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान राजपूत कुटुंबीयांच्या वकिलांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले आहे. भाजप नेत्यांनीही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संबंध जोडून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपाचा भडिमार सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा खुलासा महत्त्वचा मानला जात आहे.>मुंबई पोलीस की सीबीआय? सुप्रीम कोर्टाचा आज फैसलासुशांत सिंह आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवावे की नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय बुधवारी सकाळी देणार आहे. हा तपास सीबीआयने कारण्यास महाराष्ट्राने विरोध दर्शविला आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिनेही सीबीआय तपासास आक्षेप घेतला आहे.>ईडीचा सवाल : पैसे कमी झाल्याचे कसे समजले?सुशांत सिंहच्या बँक खात्यातून रक्कम कमी झाल्याचे तुम्हाला कसे समजले, असा सवाल ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिल्लीत त्याच्या वडिलांना केला. त्यावर माझी मुलगी त्याच्या खात्याची नॉमिनी होती. सुशांत मरण पावल्यानंतर ती बँकेत चौकशीसाठी गेली होती, तेव्हा तिला तसे सांगण्यात आले, असे वडिलांनी जबानीत सांगितले.
Riya Chakraborty : आदित्य ठाकरेंना ओळखत नाही; कधी भेटलेही नाही, रिया चक्रवर्तीचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 5:42 AM