Join us

हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही का? उद्धव ठाकरेंच्या PMO कॉलबाबत अमित शहांचं स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 7:42 PM

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी संपर्क साधला असला तरी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांशी थेट बोलणे झालेले नांही. पंतप्रधान बंगालमध्ये प्रचारासाठी गेल्याने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होऊ शकली नाही,

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी संपर्क साधला असला तरी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांशी थेट बोलणे झालेले नांही. पंतप्रधान बंगालमध्ये प्रचारासाठी गेल्याने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होऊ शकली नाही,

नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने आता महाराष्ट्रामध्ये भयावह रूप धारण केले आहे. (coronavirus in Maharashtra) कोरोनाला रोखण्यासाठी कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तरीही रुग्णसंख्येत म्हणावी तशी घट झालेली नाही. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यममंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींना (Narendra Modi) गेल्या २४ तासांत तीनवेळा फोन केला होता. मात्र, पंतप्रधाननरेंद्र मोदी फोनवर उपलब्ध झाले नाहीत. याबाबत, आता गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टीकरण दिलंय.  (Maharashtra CM Uddhav Thackeray calls PM Narendra Modi three times a day on the backdrop of rising corona)

टीव्ही ९ मराठीने उद्धव ठाकरेच्या फोनसंदर्भातील वृत्त प्रसारित केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या २४ तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तीनवेळा फोनवरून संपर्क साधला. यावेळी झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. तसेच ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून, त्यामुळे महाराष्ट्राला १२०० ते १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी संपर्क साधला असला तरी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांशी थेट बोलणे झालेले नांही. पंतप्रधान बंगालमध्ये प्रचारासाठी गेल्याने उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा होऊ शकली नाही, पंतप्रधान बंगालहून परतल्यावर मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधतील, अशी माहिती देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने या चर्चेबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले. त्यानंतर, आता अमित शहांनी याबाबत पंतप्रधानांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिलंय.  उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना पीएमओ ऑफिस लँडलाईनवर फोन केला. तिथे मोदीजी उपलब्ध नव्हते, तर ऑफिसमधून तेच सांगणार ना? पण पंतप्रधानांसोबत नेहमीच पीएम कॅम्प असते हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत नाही? या अफवा उद्धव ठाकरेंनी नाही तर, अन्य लोकांनी पसरवल्यात, असे स्पष्टीकरण अमित शहा यांनी दिलंय. तसेच, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याने असं राजकारण करु नये, असेही अमित शहा यांनी म्हटलंय.  

टॅग्स :उद्धव ठाकरेअमित शहापंतप्रधाननरेंद्र मोदीकोरोनाची लस