कुत्रे पाळताय, मग नियमही पाळा !

By Admin | Published: July 5, 2016 02:10 AM2016-07-05T02:10:41+5:302016-07-05T02:10:41+5:30

रात्री प्रवासात चोराची भीती कमी, पण भटक्या कुत्र्यांची भीती जास्त अशी परिस्थिती आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील गल्ल्यांमध्ये हजारो भटके कुत्रे आहेत. त्यांना घाबरूनच

Dogs obey, then obey the rules! | कुत्रे पाळताय, मग नियमही पाळा !

कुत्रे पाळताय, मग नियमही पाळा !

googlenewsNext

मुंबई : रात्री प्रवासात चोराची भीती कमी, पण भटक्या कुत्र्यांची भीती जास्त अशी परिस्थिती आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील गल्ल्यांमध्ये हजारो भटके कुत्रे आहेत. त्यांना घाबरूनच मुंबईकर प्रवास करतात. पण या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या श्वानप्रेमींना आता त्यांच्या संगोपनाचे नियम पाळावे लागणार आहेत. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाने भटक्या कुत्र्यांच्या पालनाची नियमावली तयार केली असून, श्वानप्रेमींना ती पाळणे बंधनकारक असणार आहे.
भटक्या कुत्र्यांचा त्रास मुंबईतील प्रत्येक नागरिकांना आहे. रात्री-अपरात्री घरी परतताना कुत्र्यांना घाबरून सारे प्रवास करतात. आतापर्यंत अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी नागरिकांनी हल्ले केले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या या त्रासावर उपाय म्हणून भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या श्वानप्रेमींवरच जबाबदारी टाकण्यात आली आहे. अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने याबाबतचा निर्णय घेतला असून आता भटक्या कुत्र्यांना सांभाळायचे असेल तर नियम पाळावे लागतील, असे म्हटले आहे. यात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढणार नाही याची काळजी श्वानप्रेमींना घ्यावी लागणार आहे. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या आरोग्याची काळजी देखील घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कुत्र्यांची नसबंदी करणे, आरोग्य तपासणी करणेही श्वानप्रेमींना बंधनकारक राहणार आहे. हे नियम मोडल्यास दंडात्मक रकमेची तरतूदही वेल्फेअरने केली आहे. (प्रतिनिधी)

हे नियम पाळाच
- भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांना त्यांच्या आरोग्य तपासणी आणि नसबंदीची जबाबदारी घ्यावी लागेल.
- इमारत परिसर, चाळीमध्ये भटक्या कुत्र्यांना आसरा देऊ नका. खेळाची मैदाने आणि लहान मुलांपासून कुत्र्यांना दूरच ठेवा.
- सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालू नका.
- कुत्र्यांना ज्या ठिकाणी खायला घालाल, तेथील शिल्लक उष्टे उचलून टाकणे, खाद्यपदार्थ घालणाऱ्याची जबाबदारी असेल.
- कुत्र्याने विष्ठा केली तर ती साफ करण्याची जबाबदारी श्वानप्रेमींची.

भटके कुत्रे असोत वा पाळीव, नियमांचे पालन केलेच पाहिजे. श्वानप्रेमींनी तर या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. कुत्र्यांना खायला घातले की जबाबदारी संपत नाही, तर त्यांची काळजी आपणच घ्यायला हवी. विशेषत: भटक्या कुत्र्यांबाबत बोलायचे झाल्यास ५० कुत्र्यांवर खाण्याचा खर्च करण्यापेक्षा फक्त १० कुत्र्यांच्या संगोपनाचा सगळा खर्च उचला. त्यामुळे कुत्र्यांपासून होणारे आजारही कमी होतील.
- सुनीश कुंजू,
सचिव, प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी

Web Title: Dogs obey, then obey the rules!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.