'सरकारी पैशातून Voice थेरेपी करत...'; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 12:45 PM2023-10-01T12:45:19+5:302023-10-01T12:46:30+5:30
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्यावर विदेश दौऱ्यावर काल आमदार आदित्य ठाकरेंनी आरोप केले.
मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्यावर विदेश दौऱ्यावर काल आमदार आदित्य ठाकरेंनी आरोप केले. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात गेली सव्वा वर्ष सत्तेवर असलेले घटनाबाह्य सरकार हे प्रत्येक विभागातील भ्रष्टाचाराची मजा घेत आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यातील काही भागात दुष्काळजन्य स्थिती आहे. गुन्हेगारी आलेख वाढू लागला आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. अशा विदारक परस्थितीत मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, काही मंत्री हे परदेश दौऱ्यात मग्न आहेत. हे परदेश दौरे म्हणजे सहली आहेत,असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
'मराठा ही पोटजात, आता बहाणे नको'; जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
या आरोपला आज भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. 'बाबा आजारी असताना सरकारी पैशातून Voice थेरेपी करत होता आणि कोणत्या कोकिळेसोबत सूर आवळत होता त्यामूळे आल्यावर आई कशी रागवली हा सर्व खराखुरा तथ्यात्मक कंटेट मांडू शकतो त्यामुळे आपली फेक बोंबाबोम फेक्टरी तात्काळ बंद करा, असं ट्विट राणे यांनी केले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
आमदार आदित्य ठाकरे काय म्हणाले?
राज्यात गेली सव्वा वर्ष सत्तेवर असलेले घटनाबाह्य सरकार हे प्रत्येक विभागातील भ्रष्टाचाराची मजा घेत आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्यातील काही भागात दुष्काळजन्य स्थिती आहे. गुन्हेगारी आलेख वाढू लागला आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. अशा विदारक परस्थितीत मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, काही मंत्री हे परदेश दौऱ्यात मग्न आहेत. हे परदेश दौरे म्हणजे सहली आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्याचा खर्च महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केला आहे. जपान दौऱ्याचा अहवाल कुठे आहे. उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही ४९ सदस्यांसह दौरे केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर २८ तासासाठी ४८ कोटी रुपये खर्च केले आहेत. जनतेच्या पैशाची अशा प्रकारे उधळपट्टी केली जात असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
बाबा आजारी असताना सरकारी पैशातून Voice थेरेपी करत होता आणि कोणत्या कोकिळेसोबत सूर आवळत होता त्यामूळे आल्यावर आई कशी रागवली हा सर्व खराखुरा Factual कंटेट मांडू शकतो त्यामुळे आपली Fake बोंबाबोम फेक्टरी तात्काळ बंद करा. @ShivSenaUBT_
— nitesh rane (@NiteshNRane) October 1, 2023