मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डॉलर्स जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 05:44 AM2018-10-20T05:44:43+5:302018-10-20T05:44:54+5:30
मुंबई : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने शुक्रवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुदानी महिलेकडून २९ हजार ३०० ...
मुंबई : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)ने शुक्रवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुदानी महिलेकडून २९ हजार ३०० अमेरिकन डॉलर्स जप्त केले. त्याची भारतीय चलनातील किंमत २१ लाख ५२ हजार २०० रुपये आहे.
हमद दारेलनेम सुलेमान सरीफ ही सुदानची महिला इथिओपीयन एअरवेजच्या फ्लाइट क्रमांक ईटी ६४१ द्वारे अॅडीस अॅबाबाला जाण्यासाठी निघाली होती. टर्मिनल २ वर सुरक्षा तपासणी सुरू असताना, सीआयएसएफची महिला कर्मचारी मीनाक्षी यांना या महिलेचे वर्तन संशयास्पद वाटले. तपासणीअंती तिच्याकडे २९ हजार २०० यूएस डॉलर्स आढळले. एवढ्या मोठ्या प्रमाणात विदेशी चलन घेऊन जाण्यासाठी तिच्याकडे पुरेशी कागदपत्रे नसल्याने तिच्याकडील विदेशी चलन जप्त करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेले विदेशी चलन पुढील कायदेशीर कारवाईसाठी सीमाशुल्क विभागाकडे सोपविण्यात आले. आरोपी महिलेचा ताबाही सीमाशुल्क विभागाकडे देण्यात आल्याची माहिती सीआयएसएफचे प्रवक्ते सहायक महानिरीक्षक हेमेंद्र सिंग यांनी दिली.