डोंबिवलीत लोकल घसरली

By admin | Published: July 20, 2015 01:19 AM2015-07-20T01:19:42+5:302015-07-20T01:19:42+5:30

डोंबिवली-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान गणेश मंदिर ब्रीजजवळ सीएसटी - कल्याण डाऊन धीम्या लोकलचा पुढून तिसरा डबा घसरल्याची घटना रविवारी स. ११.१०च्या सुमारास घडली

Dombivli local dropped | डोंबिवलीत लोकल घसरली

डोंबिवलीत लोकल घसरली

Next

डोंबिवली : डोंबिवली-ठाकुर्ली रेल्वे स्थानकांदरम्यान गणेश मंदिर ब्रीजजवळ सीएसटी - कल्याण डाऊन धीम्या लोकलचा पुढून तिसरा डबा घसरल्याची घटना रविवारी स. ११.१०च्या सुमारास घडली. यामुळे डाऊन धीमा मार्ग ठप्प, तर अप स्लो आणि अप/डाऊन जलद मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. त्या मार्गांवरील रेल्वे वाहतूक दिवसभर २०/२५ मिनिटे विलंबाने धावत होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.
डाऊन स्लोच्या प्रवाशांचा खोळंबा होऊ नये, यासाठी दिवा स्थानकातून लोकल डाऊन जलदवर वळविण्यात आल्या. परिणामी, कोपर व ठाकुर्ली स्थानकांत डाऊनवर लोकल सेवा उपलब्ध नव्हती. डाऊनवर घटना घडल्याने अप मार्गावरील लोकल काही वेळ बंद होती. त्यामुळे डोंबिवली ते कल्याण डाऊनहून आणि दिवा ते डोंबिवली अप मार्गाहून प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकमधून अपेक्षित ठिकाणी जाण्याचा पर्याय निवडला. एकीकडे लोकलसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या लांबचलांब रांगा आणि त्यातून मार्ग काढत शेकडो प्रवासी असे विचित्र दृश्य दिवा ते कल्याण मार्गावरील रेल्वे ट्रॅकमध्ये पाहायला मिळाले.
घटनास्थळी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा, ओएसडी राजीव त्यागी, रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय आयुक्त अलोक बोहरा, डोंबिवली आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. श्रीवास्तव, दीक्षित आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दुपारी सव्वातीन-साडेतीनच्या सुमारास बाधित लोकलचा डबा ट्रॅकवर आणण्यात रेल्वेच्या गँगमन, ओएचई तसेच अभियांत्रिकी आणि विद्युत कर्मचाऱ्यांना यश आले. सर्वांत आधी ती लोकल पुढे नेण्यात आली. त्यानंतर, साधारणत: दीड-दोन तास या मार्गावरील ट्रॅकचे, ओएचईचे आणि सिग्नल यंत्रणेचे काम सुरू होते. ही घटना कशामुळे घडली, याबाबतची माहिती मिळू शकली नसली तरीही तिची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले. संध्याकाळी ५च्या सुमारास लोकल सेवा पूर्ववत होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.

Web Title: Dombivli local dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.