धीमा मार्ग तीन तास ठप्प
डोंबिवली : टिटवाळ्याच्या दिशेने जाणा:या एका लोकलचा शेवटचा डबा रुळावरून घसरल्याची घटना डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी 11.5क्च्या सुमारास डाऊन धीम्या मार्गावर घडली. यामुळे तीन तासांहून अधिक वेळ हा मार्ग ठप्प झाला होता. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी या मार्गावरील वाहतूक जलद डाऊनमार्गे वळविण्यात आली होती.
ही लोकल स्थानकातून ठाकुर्लीला निघाली असताना तिचा शेवटचा डबा रुळांवरून खाली घसरला. स्थानकातून निघालेल्या लोकलचा वेग मंदावलेला असल्याने या घटनेची तीव्रता कमी झाली आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
ही सेवा पूर्ववत करण्यासाठी तब्बल साडेतीन तास लागल्याने रेल्वेची सेवा विस्कळीत झाली होती. दुपारी साडेतीन वाजता या ठिकाणचे तांत्रिक काम पूर्ववत झाले अन् त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले.