डोंबिवली : नवजात शिशुला पत्र्यावर फेकणा-या अल्पवयीन आईला अटक
By admin | Published: November 1, 2016 03:24 PM2016-11-01T15:24:39+5:302016-11-01T15:24:39+5:30
डोंबिवली पश्चिमेकडील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवजात शिशुला सोडून पळणा-या अल्पवयीन मुलीला अटक करण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १ - डोंबिवली पश्चिमेकडील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाकूरवाडी परिसरात एका बैठ्या चाळीच्या पत्र्यावर नवजात बालकाला सोडून पळणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन आईला अखेर 5 दिवसानंतर अटक करण्यात विष्णूनगर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक प्रेम संबंधातून जन्माला आलेल्या या बाळामुळे बदनामी होऊ नये यासाठीच त्या मुलीने नवजात बाळाला पत्र्यावरून फेकून पोबारा केला होता.