ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १ - डोंबिवली पश्चिमेकडील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाकूरवाडी परिसरात एका बैठ्या चाळीच्या पत्र्यावर नवजात बालकाला सोडून पळणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन आईला अखेर 5 दिवसानंतर अटक करण्यात विष्णूनगर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक प्रेम संबंधातून जन्माला आलेल्या या बाळामुळे बदनामी होऊ नये यासाठीच त्या मुलीने नवजात बाळाला पत्र्यावरून फेकून पोबारा केला होता.