कल्याण : डोंबिवलीच्या अक्षय मोगरकरने पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर दमदार कामगिरी करत ‘महाराष्ट्र श्री’ हा किताब मिळवला. डोंबिवलीकर करुणा वाघमारेने आपल्या अनुभवाच्या जोरावर सलग चौथ्यांदा ‘मिस महाराष्ट्र’च्या पुरस्कारावर नाव कोरले. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कल्याण स्पोटर््स क्लबच्या मैदानात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणमध्ये प्रथमच राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे, कल्याणकरांनी मोठ्या संख्येने स्पर्धेला हजेरी लावली. स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंनी दबदबा कायम राखत, स्पर्धेतील सर्वोच्च पुरस्कार ठाणे जिल्ह्यातच ठेवण्यात यश मिळवले. विजयी स्पर्धक उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या ‘भारत श्री’ या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करणार आहेत. विविध प्रकारच्या ८ वजनी गटात ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्राच्या २३ जिल्ह्यांतून तब्बल २३० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. अतिशय रंगतदार झालेल्या या लढतीमध्ये डोंबिवलीच्या अक्षयने इतर सर्व स्पर्धकांना मात देत, ‘महाराष्ट्र श्री’वर आपल्या विजयाची मोहर उमटवली, तर करुणा वाघमारेने सलग चौथ्यांदा ‘मिस महाराष्ट्र’चा किताब मिळवला. स्पर्धेत सांघिक विजेतेपदाचा मानही ठाणे जिल्ह्याला मिळाला. (क्रीडा प्रतिनिधी)अन्य निकाल: मेन्स फिजिक स्पर्धा: प्रसाद अमीन - (मुंबई)५५ किलो वजनी गट : १. क्रमांक संदीप पाटील (ठाणे), २. शशिकांत घुडे (ठाणे), ३. सोमनाथ पाल (पुणे)६० किलो वजनी गट : १. अमिश पांडे, २. कैलास तेलंगे (ठाणे), ३. प्रसाद अमीन मुंबई६५ किलो वजनी गट : १. रूपेश चव्हाण (पुणे), २. संतोष शुक्ल (ठाणे), ३. जगेश बाईत७० किलो वजनी गट: १. राजेंद्र रावळ (ठाणे)२. इम्रान मेहकरी (पुणे)३ जितेंद्र ढोणे ठाणे७५ किलो वजनी गट: १.अजिंक्य रेडकर (कोल्हापूर), २.लीलाधर म्हात्रे (मुंबई), ३. योगीराज शिंगे (कोल्हापूर)८० किलो वजनी गट : १. विनीत शिंदे (पुणे), २. सुशांत पवार (मुंबई), ३. प्रेम राठोड (ठाणे)८५ किलो वजनी गट : १. दुर्गाप्रसाद दास (कोल्हापूर), २. हरपीत सिंग (मुंबई), ३. साजिद कुरेशी (जळगाव).८५ पेक्षा अधिक गट : १. अक्षय मोगरकर (ठाणे), २.सागर माळी (ठाणे), ३.सचिन गलांडे (नाशिक)
डोंबिवलीचा अक्षय ‘महाराष्ट्र श्री’
By admin | Published: March 17, 2016 1:55 AM