डोंबिवलीत महिलांचा हलगी-लेझीमचा आविष्कार

By Admin | Published: September 2, 2014 11:39 PM2014-09-02T23:39:11+5:302014-09-02T23:39:11+5:30

महिला पथक. डीजे, बॅण्जोचा जमाना असला तरी लोककलेचे वैविध्यपूर्ण आविष्कार साकारून आपला पारंपरिकपणा जपण्याचे कार्य गेली अनेक वर्षे डोंबिवलीतील हे महिला पथक करत आहे.

Dombivlita Women's Movement - Lexim's Invention | डोंबिवलीत महिलांचा हलगी-लेझीमचा आविष्कार

डोंबिवलीत महिलांचा हलगी-लेझीमचा आविष्कार

googlenewsNext
ठाणो : टिळकनगर सार्वजनिक गणोशोत्सवातील विसजर्न मिरवणुकीचे आकर्षण ठरते ते विविध आविष्कार सादर करणारे महिला पथक. डीजे, बॅण्जोचा जमाना असला तरी लोककलेचे वैविध्यपूर्ण आविष्कार साकारून आपला पारंपरिकपणा जपण्याचे कार्य गेली अनेक वर्षे डोंबिवलीतील हे महिला पथक करत आहे. यंदाही पारसमणी चौकात या पथकाच्या माध्यमातून चारचौघी नव्हे तर तब्बल 4क् जणी आपल्या अंगी असलेला हलगी व लेझीम आविष्कार डोंबिवलीकरांना दाखवणार आहेत.
 डोंबिवलीतील यशराज संस्थेतर्फे लोकसंगीताचा आविष्कार बसवण्यात निपुण असलेले विवेक ताम्हणकर यांच्या संकल्पनेतून हे पथक शिकत असते. यंदाचे या पथकाचे सातवे वर्ष आहे. पहिली दोन वर्षे लेझीम पथक, तिस:या वर्षी झांज, चौथ्या वर्षी झांज आणि लेझीम, पाचव्या वर्षी झांज-लेझीम-ङोंडा आणि सहाव्या वर्षी बडोदा लेझीम पथक असे आविष्कार या महिला पथकाच्या माध्यमातून डोंबिवलीकरांनी पाहिले आहेत. साधारण सहा तास चालणा:या मंडळाच्या विसजर्न गणोश मिरवणुकीत या महिला देहभान विसरून नृत्य करतात. यंदाच्या हलगी आणि लेझीम पथकात हलगीवादन 14 तर गावरान लेझीमचा आविष्कार 24 महिला साकारणार आहेत. तसेच स्वस्तिकसारखे तर लेझीम पथक 4 ते 5 मानवी मनोरे आणि विविध आकार साकारणार आहेत. मीनल गोडबोले आणि सुरेखा कोकाटे या महिलाच करणार आहेत. 
 
पथकात 14 ते 5क् वर्षार्पयतच्या महिला असून नणंद-भावजय, काकू-पुतणी अशा जोडय़ांबरोबरच 5 पाच मायलेकी आहेत. यापैकी ईशा कोकाटे ही विद्यार्थिनी, नूपुर देशपांडे या प्राध्यापिका, पीएच.डी. करणा:या अनुजा माडीवाले, अपर्णा नाईक, ज्ञानदा विचारे, प्रांजली निमकर या विविध कंपन्यांमध्ये उच्च पदावर नोकरीला आहेत. गृहिणी असलेल्या महिलाही यात हिरिरीने सहभागी होतात. ताम्हणकर सरांच्या मार्गदर्शनाखाली या 4क् महिलांना एकत्र आणून त्यांच्याकडून सराव करून घेण्याचे कामसुद्धा सिद्धी वैद्य ही तरुणी करते. तिच्या हाताच्या खुणांवर आणि शिटीवर महिला ताल धरतात. 

 

Web Title: Dombivlita Women's Movement - Lexim's Invention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.