देशांतर्गत विमान प्रवास आणखी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:08 AM2021-08-14T04:08:33+5:302021-08-14T04:08:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इंधन दरवाढ आणि सुरक्षा शुल्काच्या भारामुळे आधीच महागलेला विमान प्रवास आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची ...

Domestic air travel became even more expensive | देशांतर्गत विमान प्रवास आणखी महागला

देशांतर्गत विमान प्रवास आणखी महागला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : इंधन दरवाढ आणि सुरक्षा शुल्काच्या भारामुळे आधीच महागलेला विमान प्रवास आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी विमान तिकीट दरांच्या किमान आणि कमाल मर्यादेत ९ ते १२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई-दिल्ली प्रवासासाठी आता किमान ५ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

लॉकडाऊननंतर देशांतर्गत विमानसेवा सुरू करताना सरकारने विमान तिकिटांचे कमाल आणि किमान दर निश्चित केले होते. त्यानुसार निश्चित रकमेपेक्षा कमी किंवा जादा भाडे विमान कंपन्यांना आकारता येणार नाही, असे आदेश जारी करण्यात आले होते. मे २०२० पासून आतापर्यंत चार वेळा दरांत वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

प्रवाशांना या वाढीव दरांवर जीएसटी, प्रवासी सुरक्षा शुल्क, विकास शुल्क आणि इतर कर अशी अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे. त्यामुळे आता मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी जवळपास ५ हजार रुपये मोजावे लागतील, अशी माहिती एका खासगी कंपनीशी संबंधित अधिकाऱ्याने दिली.

.........

नवे दरपत्रक असे (सर्व कर वगळून)

प्रवास (मिनिटे) कमाल भाडे किमान भाडे

४० मिनिटे २,९०० ८,८००

४० ते ६० ३,७०० ११,०००

६० ते ९० ४,५०० १३,२००

९० ते १२० ५,३०० १४,६००

Web Title: Domestic air travel became even more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.