सीएनजी पंपावर स्थानिक-उपरे वाद
By admin | Published: December 6, 2014 11:27 PM2014-12-06T23:27:54+5:302014-12-06T23:27:54+5:30
इंडस्ट्रियल इस्टेटमधील सीएनजी पंपावर गॅस भरताना स्थानिक व उपरे असा रिक्षाचालकांमधील वाद उफाळून आला. आमच्या जमिनी पूर्वी गेल्या आहेत,
Next
पनवेल : इंडस्ट्रियल इस्टेटमधील सीएनजी पंपावर गॅस भरताना स्थानिक व उपरे असा रिक्षाचालकांमधील वाद उफाळून आला. आमच्या जमिनी पूर्वी गेल्या आहेत, त्यामुळे पंपावर प्राधान्य मिळाले पाहिजे, असा हेका खांदा गावातील रिक्षाचालकांनी धरल्याने सुमारे तीन तास पंप बंद ठेवावा लागला. हा बाहेरचा आणि तो स्थानिक असा वाद करू नका अन्यथा कारवाईला सामोरे, जा अशा शब्दांत पनवेल पोलिसांनी तंबी दिल्यानंतर वातावरण काहीसे निवळले.
सीएनजी गॅस आर्थिकदृष्टय़ा परवडणारा असल्याने जवळपास सर्व रिक्षा सीएनजीवर चालतात. पनवेल परिसरातील पाच हजार रिक्षा सीएनजीवर धावतात. त्यामुळे आर्थिक फायदा होतो. सीएनजीमुळे प्रदूषणाला आळा बसतो. त्यामुळे तीन आसनी रिक्षा सीएनजीवर चालवण्याविषयी सरकार आग्रही आहे. पनवेल परिसरात कामोठे, तळोजा, शेंडुग आणि पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट या ठिकाणी अशा प्रकारचे पंप आहेत. तळोजा एमआयडीसीतील पंपावर महानगर गॅसच्या वाहिनीद्वारे गॅस पुरवला जातो. त्यामुळे तिथे कमी वेळात गॅस भरला जातो, मात्र इतर ठिकाणी तशी सोय नसल्याने गॅस भरण्यास वेळ लागतो. त्यामुळे या पंपावर रिक्षाचालकांची गर्दी नेहमीच असते.
पनवेल शहर आणि लगतच्या परिसरातले रिक्षाचालक इंडस्ट्रियल इस्टेटमधील पंपावर गॅस भरण्यासाठी रांगा लावतात. या पाश्र्वभूमीवर खांदा गावातील रिक्षाचालकांनी स्थानिक असल्याचा मुद्दा पुढे केला आहे. पूर्वी याच ठिकाणी आमच्या जमिनी होत्या, त्यामुळे गॅस भरण्यात आम्हाला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगत ते गेल्या काही दिवसांपासून इतर रिक्षाचालकांवर दबाव आणत आहेत. या तणावाचा उद्रेक शनिवारी झाला आणि इतर रिक्षाचालकांनी हाच मुद्दा हाणून पाडत आम्हीही गेल्या कित्येक वर्षापासून परिसरात राहतोय, अशी भूमिका घेतली. त्यामुळे तणाव होता.
पंपचालकाने त्वरित पनवेल शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला आणि त्यानुसार पोलीस पंपावर आले. त्यांनी दोन्ही बाजूकडच्या रिक्षाचालकांनी समजूत घातली. त्यामुळे काही वेळाने पंप सुरू करून वाहनांमध्ये गॅस भरण्यात आला. (प्रतिनिधी)
च्आम्ही स्थानिक असल्याने गॅस भरण्यासाठी आरक्षित रांग असावी, अशी मागणी खांदा गावातील रिक्षाचालकांनी केली. मात्र हेच वादाचे कारण असल्याने सर्वाना एकाच रांगेत गॅस भरावा लागेल. स्वतंत्र रांग कोणालाही करता येणार नाही.
च् रिक्षाचालकांनी सामोपचाराने अंतर्गत वाद मिटवावे, अन्यथा पोलीस कारवाईचा बडगा उगारण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, अशा शब्दांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी रिक्षाचालकांना समज दिली.