मुंबई : जर आपण घरगुती हिंसाचार होताना केवळ बघ्याची भूमिका पार पाडत असाल तर आपणही हिंसाचार करणाऱ्याइतकेच दोषी आहात, असे मत सिनेअभिनेत्री संध्या मृदुल यांनी कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवणाºया व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. तसेच, आपल्या आजूबाजूस कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार घडत असल्यास सामाजिक जबाबदारीचे भान दाखवत नागरिकांनी त्वरित राष्ट्रीय हेल्पलाइनवर संपर्क करून त्याचा तपशील द्यावा, असे आवाहनही या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी केले. दुसरीकडे सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सध्या संपूर्ण राज्यात कोविड पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींबरोबर होत असणाºया भेदभावपूर्ण व्यवहाराविरुद्ध, विचार बदला या व्हिडीओच्या माध्यमातून आवाज उठवला आहे.विषाणूपासून लोकांचे संरक्षण करणे हा खरे तर टाळेबंदीचा उद्देश आहे. मात्र या टाळेबंदीच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना अधिकाधिक वाढत आहेत. मार्च महिन्यात लॉकडाउन लागू झाल्यापासून राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन क्रमांकावर व आॅनलाइन पोर्टलवर ५८७हून अधिक घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी नोंदवल्या असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडब्ल्यू) अहवालातून समोर आले आहे़ टाळेबंदीमुळे लाखो महिला त्यांच्या हिंसक जोडीदारासोबत घरात अडकलेल्या आहेत. या महिलांना सुटकेचा कोणताही मार्ग दिसत नाही. आर्थिक असुरक्षितता, मूलभूत गोष्टींची वानवा आणि बंदिवासात असतानाचे संघर्ष यामुळे परिस्थिती अधिक चिघळल्यासारखी झाली आहे. केवळ बघ्याची भूमिका पार पडून चालणार नाही, तर समाज म्हणून अत्याचार रोखण्याची जबाबदारी आपण स्वीकारायला हवी. जे चूक असेल, त्याविरुद्ध उभे राहायला हवे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी लॉकडाउन लागू केला असला तरी, अनेक महिला मात्र स्वत:च्याच घरात असुरक्षिततेच्या दडपणाखाली राहात आहेत. अत्याचार व हिंसाचार सहन करून राहणाºया महिलांच्या मदतीसाठी सरकारने आणि समाजाने खास उपाययोजना राबवण्याची गरज आहे. घरातच महिलांवर अत्याचार व हिंसाचार होण्याचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे, असे संध्या मृदुल यांनी सांगितले.सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सध्या कोविड पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींबरोबर होत असणाºया भेदभावपूर्ण व्यवहाराविरुद्ध, विचार बदला या व्हिडीओच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. व्यक्तींचा व त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, अशा त्या म्हणाल्या आहेत. आपण मानसिकता बदललीच पाहिजे.एकमेकांशी हात मिळवणे गरजेचे नाही, पण अफवा व त्यांच्याबद्दल निर्माण केलेली सामाजिक कलंकत्वाची प्रतिमा तोडणे गरजेचे आहे. कोरोनाला हरवण्यासाठी योग्य विचार नक्की करा, असे सोनाली कुलकर्णी म्हणाल्या आहेत. दरम्यान, वातावरण फाउंडेशन, झटका डॉट आॅर्ग आणि बिहारस्थित सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट अॅण्ड एनर्जी डेव्हलपमेंट यांनी कोरोना विषाणूसाठीच्या जागरूकता मोहिमांची मालिका राबवली असून सदर व्हिडीओ हा त्यातीलच एक नवीन उपक्रम आहे.टाळेबंदीच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना अधिकाधिक वाढत आहेत. मार्च महिन्यात लॉकडाउन लागू झाल्यापासून राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन क्रमांकावर व आॅनलाइन पोर्टलवर ५८७हून अधिक घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी नोंदवल्या असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडब्ल्यू) अहवालातून समोर आले आहे़
हात मिळवू नका, मनं जुळवा, कौटुंबिक हिंसाचारास लॉकडाउनची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 2:40 AM