मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी अहमदाबाद येथे सकाळी दाखल झाले. भारतात दाखल झाल्यानंतर सर्वात प्रथम डोनाल्ड ट्रम्प यांनी कुटुंबीयांसह महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. मात्र साबरमती आश्रमाच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी महात्मा गांधींचा साधा उल्लेखदेखील न केल्याने मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी गुजरातमधील साबरमती आश्रमाला भेट दिली. परंतु आश्रम ज्या एका नावामुळे ओळखला जातो, त्या महात्मा गांधीजींचा साधा उल्लेखही केला नाही. त्यामुळे ट्रम्प यांना भारताचा इतिहास माहीत नसेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत मी ट्रम्प यांचा निषेध करतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह कुटुंबीय व वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ सोमवारी सकाळी 11.30 वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: विमानतळावर जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत केले.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भाषणात पाकिस्तानचा उल्लेख करतात तेव्हा...
सचिन ते विराट अन् शोले ते डीडीएलजे; ट्रम्प यांची 'मोटेरा'वर 'बॅटिंग'
मोटेरामध्ये PM मोदींनी 21 मिनिटांच्या भाषणात 22 वेळा घेतलं ट्रम्प यांचं नाव
ताजमहाल भारताच्या संस्कृती आणि सुंदरतेचं प्रतिक- डोनाल्ड ट्रम्प