Join us

CoronaVirus News : डोनाल्ड ट्रम्प भारतात कोरोना व्हायरस घेऊन आले - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 2:04 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

ठळक मुद्देडोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते.अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअमवर लाखो लोकांच्या उपस्थितीत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित केले होते. 

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना व्हायरस भारतात घेऊन आले, असा दावा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने लाखोंचा जलसा अहमदाबाद येथे झाला. या कार्यक्रमामुळेच गुजरातमध्ये कोरोना पसरला, असे संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून म्हटले आहे.

अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आलेले काही ‘डेलिगेट्स’ मुंबई तसेच दिल्लीतही वावरले आणि संक्रमण झपाट्याने पसरले, ते नाकारता येणार नाही. संक्रमण वाढणे ही चिंता आहे. ही चिंता राष्ट्रव्यापी असायला हवी. महाराष्ट्रात संक्रमण वाढले म्हणून राष्ट्रपती शासन लावा सांगणारे या काळातही राजकारण करतात, हे धक्कादायक आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. राजभवनात विरोधी पक्षाचे नेते जातात. राष्ट्रपती राजवटीची मागणी करतात. मात्र कोरोनाचे संकट हाच राष्ट्रपती राजवटीचा निकष ठरवला तर उत्तर प्रदेश, गुजरात मध्य प्रदेशसह किमान १७ राज्यांत सगळ्यात आधी राजवट लावावी लागेल. तसेच केंद्राचे सरकारही कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी अशा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. डोनाल्ड ट्रम्प आपल्या कुटुंबीयांसोबत गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर 24 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दाखल झाले होते. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठ्या जल्लोषात विमानतळावर स्वागत करण्यात आले होते. तसेच, मोठी मिरवणूक काढण्यात आली. अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअमवर लाखो लोकांच्या उपस्थितीत डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित केले होते. 

आणखी बातम्या...

राज्यातील सरकारी कार्यालयं टप्प्या-टप्प्यानं सुरू होणार, कर्मचाऱ्यांसाठी नियमावली जाहीर

CoronaVirus News : कोरोनाला हरवण्यासाठी ICMR नवा प्लॅन; सर्व राज्यांना दिला 'हा' सल्ला

नाशिकच्या शेतकऱ्यांची कमाल; 'मन की बात'मधून नरेंद्र मोदींनी केलं कौतुक!

टॅग्स :संजय राऊतडोनाल्ड ट्रम्पमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस