दहिसरच्या जम्बो कोविड सेंटरला दिले ६ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:07 AM2021-04-22T04:07:01+5:302021-04-22T04:07:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संपूर्ण मुंबई महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आणि बाधित रुग्णांना पुन्हा बरे करण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाय करीत आहे. बुधवारी पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने दहिसरच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये ६ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्यात आले.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा थेट परिणाम रुग्णाच्या ऑक्सिजन पातळीवर होतो. ही पातळी स्थिर ठेवण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची गरज अनेक रुग्णालयांत भासते आहे. अशा कठीण प्रसंगात पाच लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बुधवारी दहिसर जम्बो कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. दीपा सालियन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, नगरसेवक संजय घाडी, नगरसेविका गीता सिंघण, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर तसेच महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे आणि इतर शिवसेना पदाधिकारी तसेच दहिसर जम्बो कोविड सेंटर येथील डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित होते.
.............................