‘अनोळखी मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका’, सतर्कता आणि संयम हे दोन गुण अंगी बाळगल्यास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 11:57 AM2023-05-25T11:57:14+5:302023-05-25T11:57:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सतर्कता आणि संयम हे दोन गुण अंगी बाळगल्यास बहुतांश सायबर गुन्ह्यांना आळा बसेल. आपला ...

'Don't accept friend requests from unknown girls' | ‘अनोळखी मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका’, सतर्कता आणि संयम हे दोन गुण अंगी बाळगल्यास...

‘अनोळखी मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका’, सतर्कता आणि संयम हे दोन गुण अंगी बाळगल्यास...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सतर्कता आणि संयम हे दोन गुण अंगी बाळगल्यास बहुतांश सायबर गुन्ह्यांना आळा बसेल. आपला अकाैंट नंबर, पिन क्रमांक, पासवर्ड या खासगी गोष्टी कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. अशा स्वरूपाची विचारणा केल्यास शांतपणे समोरच्याला प्रश्न विचारा. 

आपल्या बँक प्रतिनिधींसोबत संपर्क साधून माहितीची शहानिशा करून घ्या. फेसबुकवरून येणाऱ्या अनोळखी मुलींच्या वा व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट त्वरित स्वीकारू नका. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत खासगी बाबी बोलू नका. सेक्सटॉर्शनसारख्या प्रकारांना घाबरू नका. समाजात बदनामी होईल म्हणून सेक्सटॉर्शन करणाऱ्या व्यक्तीच्या धमकीला बळी पडून पैसे देऊ नका, अशा टिप्स सायबर सेलचे निवृत्त पोलिस अधिकारी रवींद्र भिडे यांनी दिल्या.

किड्स इंटेलिजन्स या शैक्षणिक क्षेत्रातील संस्थेतर्फे अबॅकस तज्ज्ञ शिक्षक पुरस्कार सोहळा नुकताच प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विले-पार्ले पूर्व येथे पार पडला. यावेळी अबॅकस मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भिडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तेव्हा ते बोलत होते. सायबर गुन्ह्यांविषयी मुलांचे प्रबोधन आणि रक्षण या विषयी भिडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. किड्स इंटेलिजन्सच्या संचालिका शुभदा भावे यांनी त्यांची मुलाखत घेतली. ४ ते १४ वयोगटांतील चिमुकल्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्यांना भिडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्रद्धा कोंदगेकर, दिव्यता परब, कार्तिकी भोसले, लक्ष्मी प्रसन्ना, दिव्यश्री भास्कर या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला तर शुभदा भावे यांनी आभार मानले. मनिषा पाठक यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.

Web Title: 'Don't accept friend requests from unknown girls'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई