डरेंगे नहीं, लडेंगे! आवाज कुणाचा; संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 09:37 AM2022-08-01T09:37:38+5:302022-08-01T09:37:56+5:30

मुंबई महापालिका काबीज करण्याचा हा डाव आहे, असा आरोप शिवसैनिकांनी केला. महिला शिवसैनिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.

Don't be scared, fight! Whose voice? Shiv Sainik sloganeering outside Sanjay Raut's house | डरेंगे नहीं, लडेंगे! आवाज कुणाचा; संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी

डरेंगे नहीं, लडेंगे! आवाज कुणाचा; संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचे समजताच सकाळपासून राऊत यांच्या भांडूप येथील ‘मैत्री’ निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘संजय राऊत तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं... डरेंगे नही, लढ़ेंगे, आवाज कुणाचा शिवसेनेचा...’ या घोषणांनी परिसर दणाणला.

मुंबई महापालिका काबीज करण्याचा हा डाव आहे, असा आरोप शिवसैनिकांनी केला. महिला शिवसैनिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. तरुणांसह महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. विशेषत: शाखा कार्यालयांतून दाखल होणाऱ्या शिवसैनिकांनी गळ्यात भगवे उपरणे घातले होते. 
संजय राऊत यांची चौकशी, ताबा हे सगळे कुटिल कारस्थान आहे, अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून प्रसारमाध्यमांना दिल्या जात होत्या. 

पत्राचाळीचा एकही कागद नाही : सुनील राऊत
ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे आज येऊन कागदपत्रे जप्त केली. माझे बंधू संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्जासोबत संपत्तीचा जो तपशील दिला आहे, त्यातीलच ही कागदपत्रे आहेत. आयकर भरताना त्यांनी सादर केलेलीच ही कागदपत्रे आहेत. पत्राचाळीसंबंधी एकही कागद त्यांना मिळाला नाही. सगळे आरोप खोटे आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचे बंधू आ. सुनील राऊत यांनी पत्रकारांना दिली.

Web Title: Don't be scared, fight! Whose voice? Shiv Sainik sloganeering outside Sanjay Raut's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.