अफवांवर विश्वास ठेवू नका; मुंबई पोलिसांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 07:41 AM2021-11-14T07:41:20+5:302021-11-14T07:41:41+5:30

त्रिपुरा येथील कथित हिंसाचाराच्या घटनेविरोधात अमरावती, मालेगाव, नांदेड मध्ये निघालेल्या निषेध रॅलीला हिंसक वळण लागले. याच पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,धार्मिक भावना भडकाविणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Don't believe the rumors; Appeal of Mumbai Police | अफवांवर विश्वास ठेवू नका; मुंबई पोलिसांचे आवाहन

अफवांवर विश्वास ठेवू नका; मुंबई पोलिसांचे आवाहन

Next

मुंबई : धार्मिक तेढ निर्माण होईल अशाप्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ, पोस्ट  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. अशाप्रकारे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

त्रिपुरा येथील कथित हिंसाचाराच्या घटनेविरोधात अमरावती, मालेगाव, नांदेड मध्ये निघालेल्या निषेध रॅलीला हिंसक वळण लागले. याच पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,धार्मिक भावना भडकाविणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाप्रकारच्या कुठल्याही पोस्ट शेअर करू नका असे आवाहन सायबर पोलीस करत आहेत. तसेच अशा पोस्ट शेअर करणे कायद्याने गुन्हा असल्याचेही नमूद केले आहे.  अशा प्रकारच्या पोस्ट, व्हिडीओवर लक्ष ठेवण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप इत्यादी सर्व माध्यमांना कळविले आहे. विविध ग्रुप अँडमिननेही ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 

सोशल मीडियावर पेपर लीक झाल्याची चर्चा
मुंबई पोलिसांचा ट्विटर हॅन्डलवर नीलेश पोटे नावाच्या व्यक्तीने ट्विट करत, मुंबई पोलीस पदाची लेखी परीक्षा १४ नोव्हेंबरला राज्यातील विविध केंद्रावर होणार आहे. तरी अहमदनगर मधील काही केंद्रात पेपर फोडण्याच्या बातम्या येत असून पोलिसांनी लक्ष द्यावे, असे ट्विट केले आहे. यावर उत्तर देताना मुंबई पोलिसांनी, कुठलाही पेपर लीक झाला नाही. तसेच कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी खातरजमा करा असे नमूद केले आहे.

Web Title: Don't believe the rumors; Appeal of Mumbai Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.