मुंबई : राज्यभरातील विविध पोलीस घटकांकडून मुख्यालयात पाठविण्यात येणाऱ्या विविध स्वरूपाचे पत्रव्यवहार व अहवालाच्या सादरीकरणाबाबत पोलीस महासंचालकांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. थेट पत्रव्यवहार न करता ती संबंधित वरिष्ठांच्या मार्फत पाठवावयाची आहेत. त्याशिवाय येणाºया पत्रांची दखल घेतली जाणार नाही.पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल हे खात्यातील कारभारात सुधारणा व पारदर्शीपणा आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवीत आहेत. त्याचाच भाग म्हणून घटकप्रमुखांकडून येणाºया पत्रव्यवहारामध्ये अचूकता आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी यापुढे कुठल्याही प्रकारे थेट संपर्क न साधता पत्र संबंधित आयुक्त, विशेष महानिरीक्षक कार्यालयामार्फत पाठवावयाचे आहे.वरिष्ठांनी संपर्क साधल्यामुळे त्यांच्याकडे यासंदर्भात आलेल्या माहितीमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या दूर करणेही यामुळे सोपे होणार आहे. कारण या त्रृटी वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यास त्यांच्या स्तरावर त्यामध्ये सहज बदल केला जाऊ शकतो, त्यानंतरच मुख्यालयाकडे मंजुरीसाठी ते पाठविले जाऊ शकते. त्यामुळे संबंधित विषयातील त्रुटी दूर होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
'पोलीस मुख्यालयाशी थेट पत्रव्यवहार करू नका'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 3:28 AM