Join us

पडळकर, राजकारण अजून बदनाम करू नका; मनसेच्या महिला नेत्याने दिली बिरुबाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 1:03 PM

आम्ही देखील विरोधक म्हणून काम करतो पण एवढी नीच पातळीवर घसरू नये, असं रुपाली पाटील यांनी सांगितले.

मुंबई: धनगर समाजाच्या आरक्षणावरून ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे वादग्रस्त विधान बुधवारी केले होते. गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद आता राज्यभर उमटत आहे. गोपीचंद पडळकरांच्या या विधानानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आज आंदोलन करण्यात येत आहे. 

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर निर्माण झालेल्या वादावर आता मनसेने देखील उडी घेतली आहे. मनसेच्या नेत्या आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे गोपीचंद पडळकर यांना राजकारणाला बदनाम न करण्याचे आवाहन केले आहे.

राजकारणातील एवढी नीच पातळी गाठून मिळणार काय, असा सवाल रुपाली पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच आम्ही देखील विरोधक म्हणून काम करतो पण एवढी नीच पातळीवर घसरू नये, असं रुपाली पाटील यांनी सांगितले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लाभलेले मौल्यवान रत्ने आहेत.

शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला

रुपाली पाटील पुढे म्हणाल्या की, शरद पवार राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. तसेच राजकारणात त्यांची पूर्ण हयात गेली आहे, आणि कालचा झालेला आमदार जर अशी घाणेरडी टीका करत असेल तर हे अशोभनिय आहे, असं रुपाली पाटील यांनी सांगितले. टीका विचारांची देवाण घेवाण वेगळी, विरोधक म्हणून टीका ही मान्य आहे. पण अशी पातळी सोडणे म्हणजे विकृती आहे. त्यामुळे एवढा नीचपणा राजकारणात आणून राजकारण अजून बदनाम करु नका. तुम्हाला बिरुबाची शपथ आहे, असा सल्ला रुपाली पाटील यांनी गोपीचंद पडळकरांना दिला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी नक्की काय विधान केलं-  

शरद पवारांकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, त्यांना आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरच अन्याय करण्याची त्यांची भूमिका आहे. धनगर आरक्षणाच्या बाबतीत ते सकारात्मक असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. मात्र विश्वासघातामुळे सरकार पडल्यानं त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. पण या सरकारनं त्या पॅकेजमधील एक रुपयादेखील दिला नाही. फडणवीसांनी धनगरांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पाच वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. मात्र यासाठी सध्याच्या सरकारनं एक रुपयाही दिला नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनात यावर आम्हाला बोलावं लागेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा

"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला

मोदींच्या महत्त्वाच्या मोहिमेत अमेरिकेची आडकाठी; 'टेक ऑफ'साठी घातल्या अटी

CoronaVirus News: रामदेव बाबांच्या 'कोरोनिल' औषधावर ठाकरे सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

CoronaVirus News: जाहिरात थांबवा, आधी 'त्या' औषधाची सविस्तर माहिती द्या; आयुष मंत्रालयाचा पतंजलीला आदेश

टॅग्स :शरद पवारमनसेराष्ट्रवादी काँग्रेसगोपीचंद पडळकरभाजपापुणेराज ठाकरे