मद्यपान करून गाडी चालवू नका; तरुणांचा मोटार रॅलीतून संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 06:27 PM2023-12-03T18:27:01+5:302023-12-03T18:27:58+5:30
वेगाने दुचाकी वाहने चालवून रहदारीला आणि सर्वसामान्य नागरिकांना जीवघेणा त्रास होतो.
श्रीकांत जाधव
मुंबई: वेगाने दुचाकी वाहने चालवून रहदारीला आणि सर्वसामान्य नागरिकांना जीवघेणा त्रास होतो. मद्यपान करून गाडी चालवू नका... असा सामाजिक संदेश मोटार सायकल रोड सेफ्टी रॅलीतुन रविवारी तरुणांनी दिला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे उदघाटन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मोटार बाईकस्वार तरुणांनी दिला. कार्ल सिकवेरा आणि शिवसेना वांद्रे पूर्व विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता हार्डली डेव्हिडसन मोटर सायकल रोड सेफ्टी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या उदघाटन प्रसंगी विभाग प्रमुख कुणाल सरमळकर, महिला उपनेत्या कला शिंदे, पल्लवी सरमळकर, आसिफ भामला, कार्ल सिकवेरा आदी मान्यवर उपस्थित होते. वांद्रे वरळी सागरी सेतू येथून सहार रोड विलेपार्ले पूर्व तसेच पुन्हा लीलावती हॉस्पिटल अशी ही रॅली काढण्यात आली. मद्यपान करून गाडी चालवू नका, असा प्रमुख संदेश यावेळी देण्यात आला. तसेच तरुणांशी संवाद ही यावेळी साधण्यात आला.