'आत्महत्येसारखा विचारही मनात आणू नका'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 05:12 AM2019-11-04T05:12:06+5:302019-11-04T05:12:53+5:30

उद्धव ठाकरे : मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर

Don't even think like suicide, uddhav thackarey says to farmer | 'आत्महत्येसारखा विचारही मनात आणू नका'

'आत्महत्येसारखा विचारही मनात आणू नका'

Next

कन्नड/वैजापूर (जि. औरंगाबाद) : ‘शेतकरी बंधुंनो, परतीच्या पावसाने तुमचे खूप नुकसान झाले आहे, याची मला कल्पना आहे. त्यामुळेच तुम्हाला धीर द्यायला आलो आहे. चिंता करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. निराश होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा विचारही मनात आणू नका. तुम्हाला जास्तीतजास्त मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे वचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कानडगाव (वेरूळ) (ता. कन्नड) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिले.

मुंबईत बसूनही मला शेतकºयांची परिस्थिती कळाली असती. तिकडे सरकार बनविण्यासाठी धावपळ चालू राहील, पण सरकार कोणासाठी बनवायचे. सरकार बनविल्यानंतर ते माझ्या शेतकºयांना न्याय देऊ शकत नसेल, तर असे सरकार काय कामाचे. मी वचन देतो, आपले सरकार आल्यानंतर शेतकºयांचा सातबारा कोरा करेन. आत्महत्या करणार नाही, असे तुम्ही मला वचन द्या, अशी भावनिक साद त्यांनी शेतकºयांना घातली. नुकत्याच निवडणुका झाल्या. तेव्हा आम्ही मते मागण्यासाठी तुमच्याकडे आलो होतो. त्यावेळी तुम्ही आम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक किंवा इतर कागदपत्रांची विचारणा केली नव्हती. मग आता शेतकरी संकटात सापडले आहेत. तेव्हा तुमच्याकडे या कागदपत्रांची मागणी करीत अडथळे का आणले जात आहेत? तुम्ही आमची ताकद आहात. तुमच्यासाठी मी प्राणपणाला लावीन, असे ते म्हणाले. त्यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, खा. अनिल देसाई, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर आदी उपस्थित होते.

मंत्री गिरीश महाजन यांना शेतकºयांचा घेराव
पिंपळगाव बसवंत (नाशिक) : आमच्यावर आधीच दहा लाख रुपयांचे कर्ज आहे. तुमच्या पाच दहा हजारांच्या मदतीने काय होणार?
असा सवाल करत पाचोरेवणीच्या शेतकºयांनी आम्हाला तुटपुंजी
मदत नको, तर सरसकट कर्जमाफीच हवी, असा आक्रमक पवित्रा घेत पालकमंत्री गिरिश महाजन यांना शेतकºयांनी घेराव घातला. महाजन रविवारी नुकसान पाहणी दौºयावर आले होते.

अवकाळी पावसाने बाधित झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अकोला जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हैसपूर येथील शेतकºयाच्या शेतातील ज्वारीच्या पिकाची पाहणी केली. ज्वारीच्या कणसाला फुटलेले कोंब पाहून मुख्यमंत्र्यांनी हळहळ व्यक्त केली.

शेतकºयांना योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - आदित्य ठाकरे
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत आम्ही सर्वच राजकीय नेते एकत्र येऊन विविध ठिकाणी पाहणी करीत आहोत. या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्तांच्या भावना जाणून घेतल्या असून, त्यांना जास्तीतजास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अटी, शर्ती बाजूला ठेवून शेतकरी, बागायतदार, मच्छीमार यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी आमची मागणी असल्याचे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले. कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ‘क्यार’ वादळ यामुळे शेतकरी आणि मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.

...तर विमा कंपन्यांना सोडणार नाही - राठोड
यवतमाळ : विमा कंपन्यांनी दावा मंजुरीकरिता शेतकºयांची नाहक अडवणूक केल्यास विमा कंपन्या व त्यांच्या प्रतिनिधींना सोडणार नाही, असा इशारा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिला. राठोड यांनी शनिवारी वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून दाहकता त्यांना कळविली, असे राठोड यांनी सांगितले.

शेतकºयांना मदत मिळण्याबाबत शंका - विजय वडेट्टीवार
राहुरी (जि. अहमदनगर) : पावसामुळे शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे़ अधिकाºयांनी तातडीने पंचनामे करून सादर करावेत़ शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने मदत मिळण्याबाबत संशयास्पद वातावरण आहे़ वेळप्र्रसंगी दबाव आणून शेतकºयांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली़ त्यांनी राहुरी पंचायत समितीच्या सभागृहात अधिकाºयांच्या बैठकीत रविवारी नुकसानीचा आढावा घेतला़ त्यांनी राहुरी तालुक्यात शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली़

Web Title: Don't even think like suicide, uddhav thackarey says to farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.