Join us

विद्यापीठाची जागा मुंबई मॅरेथॉनला देऊ नका, युवा सेनेचा आक्षेप, कुलगुरूंना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 9:41 AM

रविवारी, २१ जानेवारीला होणाऱ्या ‘मुंबई मॅरेथॉन’साठी विद्यापीठाची कलिनातील दोन एकर मोकळी जागा भाड्याने वापरास देण्यात आली आहे.

मुंबई : ‘मुंबई मॅरेथॉन’साठी देण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील मोकळ्या जागेचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचा आक्षेप ठाकरे गटाच्या युवा सेनेने घेतला आहे. युवा सेनेचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य आणि सिनेट सदस्यांनी कुलगुरूंना पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. दोन एकर जागेच्या वापराकरिता करार झाला असताना प्रत्यक्षात जवळपास १० एकर जागा ताब्यात घेण्यात आली आहे. त्यामुळे आयोजकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

रविवारी, २१ जानेवारीला होणाऱ्या ‘मुंबई मॅरेथॉन’साठी विद्यापीठाची कलिनातील दोन एकर मोकळी जागा भाड्याने वापरास देण्यात आली आहे. ‘मुंबई मॅरेथॉन’ हा खासगी कार्यक्रम आहे. विद्यापीठाकडून घेतलेल्या जागेवर आयोजकांतर्फे कमर्शियल स्टॉल्स लावण्यात आले आहेत. थोडक्यात विद्यापीठाच्या जागेचा  व्यावसायिक कामासाठी वापर केला जात आहे. त्याकरिता अव्वाच्या सव्वा भाडे घेतले जात आहे, याकडे युवा सेनेने लक्ष वेधले आहे. 

सैन्य भरतीसाठी व्यावसायिक दरयापूर्वी लष्कर भरतीसाठी विद्यापीठाने भाड्याने जागा देण्याचा प्रस्ताव पारित केला होता. त्यावेळी व्यावसायिक दराने भाडे वसूल केले जाणार होते. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे ही जागा मोफत देण्यात आली. लष्करासाठी व्यावसायिक दराने जागा देण्याचा निर्णय भूषणावह नव्हता.- प्रदीप सावंत, माजी सिनेट सदस्य

टॅग्स :मुंबई विद्यापीठ