Join us

विनाकारण घराबाहेर पडू नका, बाजारात गर्दी करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:05 AM

पालिका प्रशासनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता मुंबईकरांनी बाजारपेठांत गर्दी करू नये. विनाकारण ...

पालिका प्रशासन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता मुंबईकरांनी बाजारपेठांत गर्दी करू नये. विनाकारण घराबाहेर पडू नये. सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.

खरेदी करून आणलेल्या वस्तू काही काळ घराबाहेर, मोकळ्या जागेत, जिथे कोणाचाही स्पर्श होणार नाही, अशा ठिकाणी ठेवाव्या. दुकानदार, व्यावसायिकांनी मास्क न लावलेल्या ग्राहकांना प्रवेश देऊ नये. दुकाने, मंडया, संकुल येथे सुरक्षित अंतराच्या खुणा करून मर्यादित ग्राहकांनाच एकापाठोपाठ प्रवेश द्यावा. दुकानात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकासाठी शारीरिक तपमान, सॅनिटायझर यांची व्यवस्था करावी. दुकाने, मंडया, संकुल येथे मर्यादित संख्येनेच नोकर, मदतनीस यांची नियुक्ती करावी. व्यवहारांसाठी शक्यतो ऑनलाइन, डिजिटल पद्धतींचा अवलंब करावा. कमीत कमी चलन हाताळावे लागेल, याची काळजी घेतल्यास संसर्गाचा धोका कमी करता येईल, अशा सूचना पालिकेने केल्या आहेत.

* जिन्यांचा वापर करा, कठड्यांना स्पर्श करू नका

- बाजारपेठेत खरेदीला जाताना घरातील एकाच व्यक्तीने जावे. तसेच कमी गर्दीच्या वेळी जावे.

- दुकानांबाहेर तसेच आतमध्येही इतरांपासून सुरक्षित अंतर राखूनच वावर करा.

- लिफ्टऐवजी शक्यतो जिन्यांचा वापर करावा. कठड्यांना स्पर्श करू नये.

- खरेदीला गेल्यानंतर तेथे प्रदर्शनार्थ ठेवलेल्या वस्तूंना स्पर्श करणे टाळावे.

- खरेदीसाठी प्राधान्याने ऑनलाइन पद्धतींचा वापर करावा.

...............................