जागावाटपाची विधानं जाहीरपणे नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही; संजय शिरसाट यांचा भुजबळांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 03:05 PM2023-12-27T15:05:39+5:302023-12-27T15:07:04+5:30

जागावाटपावरुन आता महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Don't make statements about sharing seats publicly, otherwise it won't take long for division to happen Sanjay Shirsat's warning to Bhujbal | जागावाटपाची विधानं जाहीरपणे नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही; संजय शिरसाट यांचा भुजबळांना इशारा

जागावाटपाची विधानं जाहीरपणे नको, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही; संजय शिरसाट यांचा भुजबळांना इशारा

Maharashtra Politics ( Marathi News ) मुंबई- देशात काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्वपक्षांनी निवडणुकांचे जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीमध्येही जागा वाटपाटपाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत काल मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर चर्चा केली. लोकसभाआणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्याच जागा ‘राष्ट्रवादी’च्या अजित पवार गटालाही मिळायला हव्यात, अशी मागणी छगन भुजबळ यांनी यावळी केली आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे.

शरद पवारांविषयी वादग्रस्त लिखाण; मुंबईतील MBA तरुणाच्या हाती पडल्या बेड्या!

जागा वाटपावरुन आमदार संजय शिरसाट यांनी मंत्री छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. " छगन भुजबळ यांना वेळ मिळाला आहे म्हणून ते युतीवर बोलत आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी ते करायला नको.आपल मत व्यक्त करताना ते आपल्या नेत्याकडे व्यक्त करायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट सार्वजनिक केले तर त्याचा परिणाम काय होतो हे त्यांना माहित आहे. युती होण्यापूर्वी असे विधानं करणे चुकीचे आहे. आमच्या सारख्यांनी जर त्यावर विधान केले तर मात्र फूट पडायला वेळ लागणार नाही, असा इशारा आमदार संजय शिरसाट यांनी दिला. 

लोकसभा निवडणुकीवरुन जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांनाही आव्हान दिले आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटपावरुन  आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. "विधानसभा आणि लोकसभेला समसमान जागा वाटप व्हावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. जवळपास शिंदे गटाचे जेवढे आमदार आले आहेत तेवढेच आमदार अजित पवार गटाचे आले आलेले आहेत, त्यामुळे सारासार विचार करता त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही न्याय मिळायला पाहिजे, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं होते. यावरुन आता आरोप -प्रत्यारोप सुरू  आहेत.     

Web Title: Don't make statements about sharing seats publicly, otherwise it won't take long for division to happen Sanjay Shirsat's warning to Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.